शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

क्षयरोगावर उपचार न घेणे इतरांसाठी घातक

By admin | Updated: March 24, 2015 02:29 IST

क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे.

सावधान : एका रुग्णाकडून वर्षात १० ते १५ जणांना संसर्गाचा धोकापूजा दामले- मुंबईक्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे. क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरू न करणे, हे अत्यंत घातक ठरते. हा रोग टप्प्याटप्प्याने वाढत नाही. अचानक उसळून येतो. यामुळेच प्रत्येक दिवस धोक्याची तीव्रता वाढवत असतो. जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या, झोपडपट्टीसदृश ठिकाणी राहणाऱ्या लोकांना क्षयरोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.भारतात दरवर्षी सुमारे ८ ते १० लाख नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात. ३० लाख क्षयरोग रुग्ण दरवर्षी उपचार घेत असतात. भारतात क्षयरोगाचे विषाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. आपल्याकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीमुळे क्षयरोग वेगाने पसरतो, असे ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. समीर गरदे यांनी सांगितले. क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण भारतात वाढत आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, भारतात २ ते ३ मिनिटाला एकाचा मृत्यू हा क्षयरोगामुळे होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र अजूनही याबाबत म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. यामुळे क्षयरोगाचे काही रुग्ण मध्येच उपचार सोडून देतात. मध्येच उपचार सोडल्याने काही दिवसांतच क्षयरोगाचे विषाणू औषधांना दाद देत नाहीत. अशा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास त्यालाही औषधांना दाद न देणारा क्षयरोग होतो, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे डॉ. गरदे यांनी सांगितले.च्क्षयरोग हा फक्त फुप्फुसांना नाही, तर केस आणि नखे सोडून शरीरातील सर्व अवयवांना होऊ शकतो. फुप्फुसांना होणाऱ्या क्षयरोगाचे प्रमाण ४० टक्के इतके असते. च्मणका, हीप बोन, सांधे, मेंदू या अवयवांनादेखील क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचबरोबरीने काही वेळा क्षयरोग झाल्यास घशात गाठी येतात. फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य असतो. च्इतर कोणतेही क्षयरोग संसर्गजन्य नसतात. या क्षयरोगावर २४ ते २७ महिने उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होतो.