शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘टेकआॅफ’ला ‘कभी हाँ, कभी ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:21 IST

पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे;

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे; मात्र दुसऱ्या बाजूला विमानतळबाधित गावांशी घोषणा झाल्यापासून आजवर कोणीही साधी चर्चाही केली नसल्याने गावा-गावांत साशंकतेचे वातावरणही आहे. त्यामुळे पुरंदरच्या ‘टेकआॅफ’साठी कभी हाँ...कभी ना.. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असल्याने अनेक वर्षे दुष्काळी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. येथील जनजीवन उंचावणार आहे. म्हणून तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, गोडावून, तरुणांना नोकऱ्या, व्यवसाय करण्यासाठी भविष्यात मोठी संधी निर्माण होणार आहे. मात्र बाधित गावांतील शेतकऱ्यांचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. या विमानतळासाठी आम्ही एक इंचही जागा देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आमच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आमच्या समस्या कोणी ऐकून घेत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. >जमिनींसाठी श्रीमंतांच्या फेऱ्या वाढल्या पुरंदर तालुक्यात जमिनी खरेदी करण्यासाठी उद्योगपतींच्या घिरट्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. माझी जमीन घेता का जमीन म्हणणारे शेतकरी विमानतळाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाट झाला आहे.>शेतकऱ्यांचे कल्याण होणारआंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे तालुक्याचा विकास होतानाच बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा, जमिनीतील दहा वर्षांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार असल्याने दहा पिढ्यांचे कल्याण होणार असल्याचे चित्र उभे केले जात आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल; परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर लहुजी शक्ती सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. - मस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना>गावांचा प्रखर विरोधराजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या बाधित गावांची जमीन जाणार असल्याने या गावाचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. विमानतळ होऊ नये, यासाठी बाधित गावांमधील शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत पाडव्याला काळ््या गुढ्या उभारल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत अनेक सुधारणा केल्या आहेत. पाइपलाइन, शेती ठिबक सिंचनाखाली आणून फळबागा फुलवल्या आहेत. दुष्काळी पुरंदर तालुक्यातील शेतीला प्रयत्नपूर्वक सुगीचे दिवस आले असताना आमच्या जमिनी जाणार अशी शेतकऱ्यांची भावना आहे.