शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बाजार समित्यांच्या निवडणुका तत्काळ घ्या!

By admin | Updated: October 6, 2015 02:00 IST

राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिल्याने २ बाजार समित्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने

पुणे : राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिल्याने २ बाजार समित्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या बाजार समित्यांवर प्रशासक कायम ठेवले आहेत. मात्र, तत्काळ निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे २२ जानेवारीपर्यंत बाजार समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्या समित्यांची मुदत संपली तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. याविरोधात कडा (जि. बीड) व शिरपूर (धुळे) या बाजार समित्यांचे संचालक न्यायालयात गेले होते. एकतर संचालक मंडळाला मुदतवाढ द्या, अथवा तत्काळ निवडणुका घ्या, अशी भूमिका घेत या संचालक मंडळाने प्रशासक नियुक्त करण्यास विरोध केला होता.न्यायालयाने प्रशासक रद्द करण्याची मागणी मान्य केलेली नाही; परंतु या दोन समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असल्याचे पणन विभागाचे प्रभारी संचालक किशोर तोष्णीवाल यांनी सांगितले. राज्य सरकारने समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने सध्या तीसहून अधिक समित्यांवर प्रशासक आहेत.