शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील ‘त्या’ मुलांचेही सर्वेक्षण करा

By admin | Updated: July 1, 2016 03:59 IST

मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर बालपण व्यतित करणाऱ्या मुलांची संंख्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या (टिस) सर्वेक्षणामुळे उघडकीस आली.

मुंबई : मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर बालपण व्यतित करणाऱ्या मुलांची संंख्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या (टिस) सर्वेक्षणामुळे उघडकीस आली. परंतु, राज्यातील अन्य शहरांत अशाच प्रकारे रस्त्यांवर जीवन जगणाऱ्या मुलांची संख्या अद्याप समोर न आल्याने, उच्च न्यायालयाने मुंबईप्रमाणेच राज्यातील अन्य शहरांतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी सूचना गुरुवारी राज्य सरकारला केली.मुंबईच्या रस्त्यांवर ३९ हजार मुले राहत असल्याचे टिसने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. सर्वेक्षणानंतर सर्व मुलांना ओळखपत्र देण्यात आले. ही मुले मुंबईच्या बाहेरची असल्याने त्यांना हे ओळखपत्र मिळू शकले, असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले. रस्त्यावर भीक मागून जीवन व्यतित करणाऱ्या मुलांचे पुनर्वसन करण्यात यावे व त्यांना शिक्षण देण्यात यावे, यासाठी अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबईप्रमाणे अन्य शहरांतील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करण्याची सूचना राज्य सरकारला केली.याचिकेच्या सुनावणीदरम्यान ‘न्यायालयाचे मित्र’ म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एच. मार्लापल्ले यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनाबाबत लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. या मुलांवर माफियांचे नियंत्रण आहे की नाही? याचा शोध लावा आणि आम्हाला कळवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने अ‍ॅड. देसाई यांना देत या याचिकांवरील सुनावणी ६ जुलै रोजी ठेवली आहे. गेल्या सुनावणीवेळी अन्य खंडपीठाने या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश दिले होते. विस्थापित मुलांचे पुनर्वसन करणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले होते. (प्रतिनिधी) >प्रशासनांना योग्य ते आदेश द्यावेत‘मुंबई, पुणे, ठाणे व राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांत प्रवास करताना ३ ते १४ या वयोगटातील मुले भीक मागताना दिसतात. राज्यघटनेने त्यांना दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराचा बळी चढवत ही मुले भीक मागत असतात. त्यामुळे या मुलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात ठेवावे आणि त्यांना शिक्षण द्यावे, यासाठी राज्य सरकारसह संबंधित प्रशासनांना योग्य ते आदेश द्यावेत,’ असे न्या. मार्लापल्ले यांनी पत्रात म्हटले आहे. या मुलांवर माफियांचे नियंत्रण आहे की नाही? याचा शोध लावा आणि आम्हाला कळवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने अ‍ॅड. देसाई यांना देत या याचिकांवरील सुनावणी ६ जुलै रोजी ठेवली आहे.