शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ‘रूम्हणे’ हातात घ्या-मुंढे

By admin | Updated: July 5, 2016 01:12 IST

बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधीपक्ष नेते मुंढे यांनी शेतक-यांना आवाहन केले.

बुलडाणा : शेतकर्‍यांकडे पाहण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला वेळ नाही. लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. यावेळी मतदारांना दाखविण्यात आलेले स्वप्ने खोटी होती. ही स्वप्ने खोटी असल्यामुळे पूर्ण होणारी नाहीत. अशी खोटी स्वप्ने दाखविणार्‍या विरूध्द व संपूर्ण कर्जमुक्तीसाठी हातात रूम्हणे घ्या, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी २५ हजार शेतकर्‍यांच्या सह्या असलेले निवेदन स्विकारण्यासाठी ४ जुलै रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, अँड.साहेबराव सरदार आदींची उपस्थिती होती. , यावेळी धनंजय मुंढे पुढे म्हणाले की, जनतेला पर्याय हवा होता आणि एक व्यक्ती देशाला फसवित होती. यावेळी त्याने दाखविलेली स्वप्ने खोटी होती. मात्र निवडणुकीनंतर भाजपाने दाखविलेली स्वप्ने, घोषणा हवेत विरली. राज्य सरकारने राज्यातील २४ नगरपालिकेतील १७ हजार व्यापार्‍यांचा ३ हजार कोटीचा एलबीटी माफ केला आहे. या सरकारच्या १७ महिन्याच्या काळात ८ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत. सरकारला येणार्‍या पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धारेवर धरणार असल्याचे सांगून आपला हक्क मिळविण्यासाठी त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, रूम्हणे हातात घेवून सळो की, पळो करून सोडा असे आवाहन त्यांनी केले.

'वर्षा'वर गाय घेऊन जाणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, की आम्ही शेतकरी विरोधी नाही, मी पाच पिढय़ांचा शेतकरी आहे. मलाही गाईचे दूध काढता येते, मात्र फक्त बसण्याची अडचण आहे. मी येणार्‍या काळात वर्षा बंगल्यावर गाय घेऊन जाणार आहे. त्यांना बसणे नाही म्हणून टेबलावर गाय उभी करुन मुख्यमंत्र्यांकडून दुध काढून घेणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता.