शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

...तर महाराजांची शपथ घेऊन सांगा, पारदर्शी कारभार केलाय म्हणून

By admin | Updated: February 16, 2017 22:19 IST

हिंम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पथ घेऊन सांगा की,मुंबई महानगर पालिकेत 20वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने भ्रष्टाचार केला नाही असे थेट आव्हान

 ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - हिंम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पथ घेऊन सांगा की, मुंबई महानगर पालिकेत 20 वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने भ्रष्टाचार केला नाही, असे थेट आव्हान केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिवसेनेला दिले. रात्री विलेपार्ले पूर्व येथील महिला संघाजवळील लक्ष्मी नारायण मैदानावर भाजपाच्या उमेवारांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. ही हिंमत शिवसेना दाखवणार नाही, राजकारण हे पैसे कमवण्याचे साधन नाही असे सांगून त्यांचे नगरसेवक आणि अधिकारी टक्केवारी गुंतले असल्याची टीका त्यांनी केली.भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभार करण्यासाठी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भाजपाला मुंबई महानगर पालिकेत एकमुखी सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.पालिका निवडणुकीतील प्रभाग क्र 80 चे उमेदवार सुनील यादव,प्रभाग क्र 83च्या उमेदवार पूर्णिमा माने,प्रभाग क्र 84चे उमेदवार अभिजित सामंत, प्रभाग क्र 85च्या भाजपा उमेदवार आणि विद्यमान नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या प्रचारार्थ येथील आमदार पराग अळवणी यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. सेनेवर टिकेचे आसूड ओढताना गडकरी पुढे म्हणाले की,गेली 25वर्षे भाजपाशी युती करून शिवसेना सोडली असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते.मात्र युती मध्ये दोघांचाही फायदा झाला होता,भाजपा बरोबर युती नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला नसता असा टोला त्यांनी लगावला.नागपूर सारख्या शहराचा येथील महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भा जपाने पारदर्शी कारभार केला असून, तो विकास शिवसेनेला गेल्या 20 वर्षात का जमला नाही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.त्यांनी यावेळी त्यांच्या दृष्टीक्षेपात असलेल्या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाची माहिती देऊन अशा प्रकारचा जागतिक दर्जाचा विकास मुंबईत करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.