शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

अपघातमुक्तीसाठी पुढाकार घ्या

By admin | Updated: August 15, 2016 01:10 IST

अपघाताचे आणि प्रदूषणाचे प्रमाण पुण्यात खूप जास्त आहे. दर वर्षी देशात ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये ३ लाख लोक मृत्यू जातात.

पुणे : अपघाताचे आणि प्रदूषणाचे प्रमाण पुण्यात खूप जास्त आहे. दर वर्षी देशात ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये ३ लाख लोक मृत्यू जातात. देशातील अपघात होणारी ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून त्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सीआरएफला देण्यात आलेल्या ६ हजार कोटी रुपयांच्या निधीमधील १० टक्के तरतूद ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी खर्च केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुण्याला अपघात आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.अनिल शिरोळे यांनी गेल्या दोन वर्षांत खासदार म्हणून केलेल्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, संघटनमंत्री रवी भुसारी, खासदार संजय काकडे, अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, ‘‘मी लहानपणी माझ्या पुण्यातील बहिणीकडे यायचो त्या वेळी इथे खूप सुंदर हवा होती. कालांतराने पुणे वेगाने वाढत चालले आहे. मात्र, पुण्याचे पुणेपण हरवता कामा नये. देशात रस्त्यांच्या दुतर्फा १२ लाख किलोमीटर झाडे लावली जाणार आहेत. त्यामुळे सर्व रस्ते ग्रीन झाल्याचे चित्र लवकरच पाहायला मिळेल. पुढील ५ वर्षांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी पुणे विभागामध्ये १ लाख कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल. पावसाचे ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जात आहे, हे पाणी अडविण्यासाठी २८ प्रकल्पांची उभारणी येत्या काही दिवसांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येईल.’’ पुण्याच्या मागच्या खासदारांचे नाव स्कँडलमध्ये आले होते; मात्र अनिल शिरोळेंचे नाव त्यांच्या आयुष्यात कधीही अशा कुठल्या गैरव्यवहारात येणार नाही. गेल्या २५ वर्षांत झाले नाही ते येत्या ५ वर्षांत करून दाखवतील, अशी ग्वाही या वेळी गडकरी यांनी दिली.प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘शहरातून सर्व खासदार, आमदार भाजपाचे निवडून आले आहेत, आता पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. गेल्या २ वर्षांत चांगली कामे झाली आहेत.’’ गिरीश बापट यांनी विचार व्यक्त केले. अनिल शिरोळे यांनी प्रास्ताविक केले. >निवडून आल्यावर बदलू नकामाजी पंतप्रधान अटलबिहारी यांची आठवण सांगताना दानवे म्हणाले, ‘‘आम्ही नव्याने खासदार म्हणून निवडून गेलो होतो, त्या वेळी अटलजींनी आमची कार्यशाळा घेतली होती. त्यांनी सांगितले होते, ‘निवडून आल्यानंतर तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये बदल करू नका, अगदी केसांचा भांगही बदलू नका, तुमच्या नेहमीच्या व्यवहारात बदल करू नका. नाहीतर निवडून आल्यावर हा बदलला, असा समज जनतेचा होतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर खूपच जबाबदारीने वागावे लागते.’’>महापौरांनी दिले निवेदनमहापौर प्रशांत जगताप यांनी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे भेट घेऊन पुण्याच्या प्रश्नांबाबत निवेदन दिले. केंद्राकडे प्रलंबित असलेले मेट्रो, नदी सुधारप्रकल्प, चांदणी चौक उड्डाणपूल, कात्रज चौक विकसित करणे, सुस रोड उड्डाणपूल आदी प्रकल्प वेगाने मार्गी लागावेत, अशी विनंती त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.