शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, रामटेक येथे शांतिनाथ जैन मंदिरात राष्ट्रपती कोविंद यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 16:52 IST

कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ‘इंडिया’ला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना केले. विद्यासागरजी महाराज हे आपल्या मुनिसंघासोबत अतिशय श्रीक्षेत्र रामटेक येथील या जैन मंदिर परिसरात चातुर्मास करत आहेत.

नागपूर : कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ‘इंडिया’ला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना केले. विद्यासागरजी महाराज हे आपल्या मुनिसंघासोबत अतिशय श्रीक्षेत्र रामटेक येथील या जैन मंदिर परिसरात चातुर्मास करत आहेत.आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्या दीक्षा घेण्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संयम स्वर्ण महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. सकाळी ११.५० च्या सुमारास राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित होते.सुरुवातीला राष्ट्रपती व सर्व मान्यवरांनी आचार्यश्रींना नमन करुन श्रीफळ अर्पण केले. यानंतर राष्ट्रपतींनी शांतिनाथ जैन मंदिराला भेट दिली. दर्शनानंतर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या खासगी कक्षात आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी राष्ट्रपतींशी संवाद साधला.इसवी सन सुरू होण्याच्या अगोदरपासून देशाला भारत हे नाव आहे. ‘इंडिया’ व ‘भारत’ या दोन्ही नावांतून वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. भारत स्वदेशी भावनेशी जुळला आहे. त्यामुळे देशाच्या नीतीनिर्मात्यांनी भारत याच नावाचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. भारतीयत्वाची अर्थात आपल्या संस्कृती व सभ्यतेची ओळख देशाच्या प्रत्येक नागरिकाला व जगाला व्हावी, यासाठी धोरण ठरावे, अशी अपेक्षा आचार्यश्रींनी व्यक्त केली. तसेच विविध देशांचे उदाहरण देत मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याचेही आचार्यश्रींनी सांगितले. आचार्यश्रींनी रचलेले महाकाव्य ‘मूकमाटी’च्या उर्दू आवृत्तीचे राष्ट्रपतींनी प्रकाशन केले.>आचार्यश्रींना भेटून आत्मिक समाधानाची अनुभूती - राष्ट्रपती‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी राजभवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना भेटून आत्मिक समाधानाची अनुभूती प्राप्त होते, अशी भावना कोविंद यांनी व्यक्त केली. कोविंद यांची आचार्यश्रींसोबत ही दुसरी भेट आहे. मागील वर्षी आचार्यश्रींचा चातुर्मास भोपाळमध्ये झाला होता. त्यावेळी एका विशेष कार्यक्रमात बिहारचे राज्यपाल या नात्याने कोविंद यांनी आचार्यश्रींचे आशीर्वाद घेतले होते. शुक्रवारच्या भेटीत या आठवणींना उजाळा मिळाला.>राष्ट्रपतींनी घेतली जैन मुनी आचार्यांची भेट : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील ऐतिहासिक शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांची भेट घेऊन अभिवादन केले. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवर उपस्थित होते.>नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट देऊन तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले व मान्यवर उपस्थित होते.