शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्या!

By admin | Updated: May 20, 2014 03:40 IST

गेल्या काही दिवसांमध्ये नौदलाच्या बोटींचे सातत्याने अपघात होत असून, हे अपघात टाळण्यासाठी नौदलाच्या अधिकारी आणि जवानांनी पुरेशी खबरदारी घ्यावी,

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये नौदलाच्या बोटींचे सातत्याने अपघात होत असून, हे अपघात टाळण्यासाठी नौदलाच्या अधिकारी आणि जवानांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, अशा सूचना नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर.के. धोवन यांनी दिल्या आहेत. नौदलप्रमुख झाल्यावर पश्चिम नौदलतळाला त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली. धोवन हे १८ आणि १९ असे दोन दिवस मुंबई दौर्‍यावर आहेत. सोमवारी आयएनएस शिक्रा बोटीवर संचालनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सागरीसीमेवरील आव्हाने मोठी असून, या आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदलाचे सामर्थ्य वाढवण्याचे काम सुरू आहे. सामर्थ्य वाढवणे आणि अपघात टाळण्यासाठी नौदलाकडून प्राधान्याने लक्ष दिले जाईल. हे सांगतानाच सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वदेशी निर्मितीवर आमचा भर राहणार असून, विक्रमादित्य, तेग आणि शिवालिक श्रेणीच्या विमानवाहक युद्धनौका, चक्र आण्विक पाणबुडी आणि काही छोट्या-मोठ्या मध्यम आकाराच्या बोटींची स्वदेशी निर्मितीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या निर्मितीला वेळ लागणार असेल आणि नौदलाची गरज असेल तर वेळ पडल्यास तंत्रज्ञान आयातही केले जाईल. नौदलात काम करणारा प्रत्येक जण आपल्या कामात निपुण असून, कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास ते सज्ज असल्याचेही नौदलप्रमुखांनी सांगितले. या वेळी विक्रांत लिलावाबाबत नौदलाची भूमिका काय, असे विचारले असता कोर्टाच्या आदेशाचे नौदल पालन करेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)