शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणसेवकांना सेवेत घ्या

By admin | Updated: May 19, 2016 02:46 IST

शाळांच्या संचमान्यतेत सेवेतून कमी झालेल्या शिक्षणसेवकांना संरक्षण देण्याची मागणी शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली

मुंबई : शाळांच्या संचमान्यतेत सेवेतून कमी झालेल्या शिक्षणसेवकांना संरक्षण देण्याची मागणी शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. वर्ष २०१३-१४ पासून विद्यार्थी संख्या कमी झाल्याने व तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण न होऊ शकल्याने शिक्षणसेवकांना अतिरिक्त ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली असून त्यांना सेवेत घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.याआधी शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणसेवक म्हणून नोकरीतून बाहेर पडलेल्या एकाही शिक्षक किंवा शिक्षणसेवकाला बेरोजगार होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या आश्वासनाचे रुपांतर निर्णयात झाल्याचे दिसत नसल्याची टीका शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून सर्व शिक्षक व शिक्षणसेवकांना सेवेत सामावून घेण्याची मागणी मोते यांनी केली आहे. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती १९८१ च्या नियमावलीमधील तरतुदीनुसार कायम झालेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरल्यानंतर संरक्षण देण्यात आले. शिवाय त्यांचे समायोजन अन्य शाळांमधील रिक्त पदावर करण्यात आले. मात्र अद्यापही काही शिक्षक समायोजनाअभावी अतिरिक्त आहेत. मात्र अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांपैकी शिक्षणसेवक म्हणून काम करणारे शिक्षक हे सेवेतून बाहेर पडले असून त्यांना संरक्षण मिळालेले नाही. त्यांपैकी बहुतेक शिक्षण सेवक अनुशेष पूर्ण करण्यासाठी मागासवर्गीय शिक्षणसेवक होते. त्यामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षणसेवकांना तत्काळ सेवेत सामावून घेण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केले आहे.शिक्षणसेवकांना सामावून घेणार - शिक्षणमंत्रीशाळांच्या संचमान्यतेत पद कमी झाल्याने शिक्षणसेवकांची नोकरी जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षणसेवकांविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल. शिवाय शिक्षणसेवकांचे समायोजन लवकरच केले जाईल, असेही तावडे यांनी आश्वासित केल्याचे बोरनारे यांनी सांगितले.