शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घ्या खंजीर....अन् लागा कामाला!

By admin | Updated: September 2, 2014 01:58 IST

माझंच चुकलं. युद्धाची सारी जबाबदारी मी केवळ ‘रायगडाच्या सरदारा’वर टाकली. तुमचा विचारच केला नव्हता.

(‘ताबडतोब येऊन भेटा,’ असा खलिता ‘थोरल्या काकां’कडून येताच दादा गडबडले. ‘आपण आबांची मोजलेली उंची बहुधा आवडली नसावी,’ याचा विचार करतच ते ‘काकां’च्या छावणीत डेरेदाखल झाले.)
दादा : (हळूच) काकाùù माझं काही चुकलं का?
काका : (गंभीरपणो) नाही. माझंच चुकलं. युद्धाची सारी जबाबदारी मी केवळ ‘रायगडाच्या सरदारा’वर टाकली. तुमचा विचारच केला नव्हता. काम नसलं की  माणूस काहीही बोलतो. असो. आता महत्त्वाचं बोलू. रणधुमाळी सुरू झालीय. आपली शस्त्रं परजायला हवीत.
दादा : (उत्साहनं) होय. होय. ठासून सुरुंग भरलेल्या मुलूख मैदानी तोफा मी ‘सूरत’च्या दिशेने सज्ज ठेवल्यात.
काका : (रोखून बघत) तुम्हाला सुरतेवर हल्ला चढवायचाय की मुंबई प्रांत सांभाळायचाय ?
दादा : वांद्रे परिसरातही आपले कैक सरदार म्यानातून बाहेर काढलेल्या तलवारी तळपवू लागलेत.
काका : (कपाळावर आठय़ा) थांबा. घाई करू नका. आधी तुमचा दुश्मन कोण, हे ओळखा. मग युद्धनीती आखा.
दादा : (काहीतरी आठवल्यासारखं) हां. हां. आलं लक्षात. ‘गनिमांशी तह अन् स्वकीयांशी युद्ध’ हीच तर तुमची खास रणनीती नां. ऐकत आलोय मी लहानपणापासून.
काका : (गालातल्या गालात हसत) हुश्शाùùर आहात. म्हणूनच तर तुम्हाला मी गेली पाच वर्षे मुख्य सिंहासनापासून दूर ठेवलंय. नाही तर माझीही पार वाटùù
दादा : (विषय बदलत) मग आपल्याच स्वकीयांशी लढण्यासाठी यंदा शस्त्रं कोणती वापरायची काका?
काका : (खंजिरांनी भरलेली पोती दाखवत) ही घ्या आपली खास शस्त्रं. यंदा ‘बाबां’च्या टापूतले जेवढे काही सव्वाशे-दीडशे सैनिक असतील, त्या सा:यांसाठी ‘पाठी’मागून हे शस्त्र वापरा. आपले सव्वाशे सैनिक इकडं सुरतेशी लढतील अन् ‘बाबांचे सैनिक’ तिकडं परस्पर खंजिरामुळं धारातिर्थी पडतील, याचं नियोजन करा. चला. लागा कामाला.
(‘सशस्त्र गोणी’सह दादा बाहेर आले. त्यांनी ‘काकां’च्या सरदारांना दीडशे खंजीर वाटले. सारे गेले.  मग आपल्या काही ‘खास’ सरदारांना त्यांनी हळूच बोलावलं. खिशात लपविलेले अजून काही खंजीर बाहेर काढले.)
दादा : (कुजबुजत) हे घ्या पंचवीस-तीस खंजीर. आपल्याच काही सरदारांसाठी याचा यंदा गुपचूप वापर करायचाय. ‘मुख्य सिंहासन’ मिळवायचं असेल तर मला माझीही ताकद वाढवावीच लागणार आहे. आलं का लक्षात..मग,  लागा कामाला.
                            - सचिन जवळकोटे