शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तब्येतीची काळजी घ्या! पवारांचा भुजबळांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 03:54 IST

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत प्रकृती संदर्भात चर्चा झाली. पवार यांनी विशेष काळजी घ्या, असे सांगितल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.जामिनावर सुटल्यानंतर केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भुजबळांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, आज भुजबळांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल दोन वर्षांनंतर भुजबळ-पवार भेट होणार असल्याने, राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या वेळी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगत, भुजबळांनी अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. मात्र, पवारांनी वडीलकीच्या नात्याने तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचे भुजबळांनी आवर्जून सांगितले.दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवार यांचा आला होता, असे भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्याचबरोबर, शिवसेनेचेही आभार मानले होते. या पार्श्वभूमीवर भुजबळ-पवार भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंकाळी भुजबळ यांची भेट घेतली़

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवार