शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संप मागे घ्या आणि चर्चेसाठी या - सदाभाऊ खोत

By admin | Updated: June 1, 2017 17:46 IST

शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - आपल्या विविध मागण्यासाठी आजपासून जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाने संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक बाजारपेठा ठप्प झाल्यात, तर अनेक ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची चर्चा फिसकटल्यानंतर बळीराजाने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. सरकार कोणत्याही अटी ठेवून चर्चा करत नाही. शेतकऱ्यांसोबत आम्ही मार्ग काढू. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे. सगळ्यांनी चर्चेसाठी यावं. त्यामधून तोडगा काढू, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत म्हणाले की,  शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत संपर्कात आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दिलासा देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आंदोलनकर्ते, शेतकरी नेते यांच्यासोबत चर्चेसाठी आजही सरकारची दारं उघडी आहेत. शेतकऱ्यांनीही एक पाऊल पुढे टाकत चर्चेला यावं. चर्चेतून निश्चित तोडगा निघेल. शेतकऱ्यांना आवाहन करतो हिंसक होऊ नये, शांततेत आंदोलन करावं, अन्नधान्याची-दुधाची नासाडी करु नये.