शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा !

By admin | Updated: November 8, 2015 01:09 IST

राज्यातील मेडिकल महाविद्यालयातील प्रवेश प्रक्र्रियेत घोटाळा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाला सुमारे दोन वर्षे होत

मुंबई : राज्यातील मेडिकल महाविद्यालयातील प्रवेश प्रक्र्रियेत घोटाळा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाला सुमारे दोन वर्षे होत आली, तरी वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई केलेली नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाई करून सर्वोच्च न्यायालयाचा मान राखावा, अशी मागणी सिटिझन फोरम संघटनेने शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.राज्यात २0१२-१३ या शैक्षणिक वर्षात मेडिकल महाविद्यालयातील प्रवेशाचा मोठा घोटाळा उघडकीस आला. न्यायासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने पालकांना न्याय देत, २0 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे, घोटाळा रोखण्यात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.मेडिकल महाविद्यालयातील घोटाळ्याचे प्रकरण प्रलंबित असतानाच राज्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांना मान्यता मिळविण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याबाबतची माहिती सिटिझन फोरमने डीटीई, प्रवेश नियंत्रण समिती आणि शिक्षण शुल्क समितीकडे सादर केली आहे, तसेच राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नसल्याचे, सरकारने नेमलेल्या समित्यांच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. असे असूनही अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्यात येत असल्याबद्दल, सिटिझन फोरम फॉर सॅन्क्टिटी इन एज्युकेशन सीस्टिम या संघटनेचे वैभव नरवडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.