शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई

By admin | Updated: October 18, 2016 05:27 IST

महापालिकांना एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्टच्या नियमांचे पालन न करताच फटाक्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

मुंबई : दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे आग लागून जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह राज्यातील सर्व महापालिकांना एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्टच्या नियमांचे पालन न करताच फटाक्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.‘आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना न आखताच रहिवासी क्षेत्रात फटाक्यांचा साठा केल्याने अनेक वेळा आग लागते. त्यामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी होते. दिवाळीदरम्यान हे प्रमाण वाढते. संपूर्ण देशात अशा दुर्घटना घडत असतात. त्यामुळे राज्य सरकारने व महापालिकांनी बेकायदेशीरपणे फटाक्यांचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करावी,’ असे न्या. व्ही.एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले.नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लासुरे यांनी नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे फटाके विकणाऱ्या व साठा करणाऱ्यांवर सरकारला आणि महापालिकेला कारवाई करण्याचा आदेश द्यावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्टनुसार फटाक्यांचा साठा रहिवासी क्षेत्रात केला जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून परवाना मिळवावा लागतो. नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या फटाके विकण्यात येत आहेत. वास्तविक फटाके खुल्या मैदानावर विकले पाहिजेत. त्यावर नाशिक महापालिकेने बेकायदेशीररीत्या फटाके विकणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द केला असून पुढील कारवाई पोलिसांनी करायची आहे, असे खंडपीठाला सांगितले.‘सरकारने व महापालिकांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी कारवाई करावी. राज्य सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली हे पुढील सुनावणीला सांगावे. ही याचिका केवळ नाशिक महापालिकेपुरतीच मर्यादित नाही. आम्ही राज्यातील सर्व महापालिकांना कारवाई करण्यास सांगत आहोत,’ असेही खंडपीठाने सुनावणीत स्पष्ट केले.या वेळी उच्च न्यायालयाने दुकानदारांनाही सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)>शिक्षकांचे मानले आभारसरकारने व महापालिकांनी रहिवासी क्षेत्रात फटक्यांचा साठा करण्यास परवानगी देऊ नये. खुल्या मैदानात फटाक्यांची विक्री व साठा करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवणे सहज शक्य होईल, असे म्हणत पुढील सुनावणी २५ आॅक्टोबरला ठेवली.‘अलीकडे तिसरी-चौथीतील मुले फटाके वाजवण्यास नकार देतात. निदान मुंबईत तरी असे चित्र आहे. विद्यार्थ्यांना याची माहिती देणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले पाहिजेत,’ असे खंडपीठाने म्हटले.