शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा,विखे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By admin | Updated: January 19, 2017 22:48 IST

नोटाबंदी विरोधात बुधवारी नागपूर येथे रिझर्व्ह बँकेसमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 19 - नोटाबंदी विरोधात बुधवारी नागपूर येथे रिझर्व्ह बँकेसमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसचे आंदोलन अतिशय शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बँंकेच्या आत गेले असता बाहेर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर प्रचंड लाठीमार केला. त्यामध्ये अनेकांना दुखापती झाल्या. दडपशाही पद्धतीने आंदोलन पांगविण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करून ताब्यात घेण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाला त्याच ठिकाणी पुन्हा ठिय्या आंदोलन करावे लागले. पोलिसांच्या  बेजबाबदारपणामुळे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर नाहक लाठीमार करून परिस्थिती गंभीर करण्याच्या या प्रकाराची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी पत्रात केली आहे.