शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

प्रचार करणाऱ्यांवरही कारवाई करा

By admin | Updated: May 19, 2016 05:10 IST

१२ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेली मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी क्यूनेट पुन्हा एकदा चर्चेत आली

मुंबई : देशातील सुमारे १२ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेली मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी क्यूनेट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लोकांची लुबाडणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रचार सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार करत आहेत. त्यामुळे त्या कलाकारांची चौकशी करून सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार गुरूप्रीत सिंग आनंद यांनी केली आहे.बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत गुरूप्रीत आनंद यांनी ही मागणी आर्थिक गुन्हे शाखा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या वेळी ‘आय ट्रस्ट क्यूनेट’ असे फलक घेऊन कंपनीच्या वितरकांनी पत्रकार परिषदेत मूक निदर्शने केली. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आझाद मैदान पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. काही काळ आझाद मैदानात ठेवल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले.पत्रकार परिषदेत गुरूप्रीत आनंद म्हणाले की, कंपनीच्या व्यवहारांची चौकशी सुरू असून घोटाळा झाल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. तरी या घोटाळ्यात अनेक बड्या राजकीय नेत्यांसह केंद्र शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शिवाय कंपनीच्या काही संचालकांना पोलिसांनी लूक आऊट नोटीसही पाठवेलली आहे. तरीही कंपनीमार्फत मलेशियामध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील हजारो लोकांसह अभिनेता अनिल कपूरही निदर्शनास आला आहे. कंपनीने सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनिल कपूर या कंपनीत भागीदार झाल्याचे पोस्ट केले आहे. याआधी अभिनेता शाहरूख खान, आमीर खान, बोमन इराणी आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्यासह अनेक बड्या सिनेकलाकारांनी या स्कीमचा प्रचार केल्याचा आरोप गुरूप्रीत यांनी केला आहे. शिवाय त्याचे सर्व पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपुर्द केल्यचेही त्यांनी सांगितले.>‘त्या’ कलाकारांनी देशाची माफी मागावीक्यूनेटचा प्रचार करणाऱ्या आणि त्यातून पैसा कमावणाऱ्या कलाकारांनी देशाची माफी मागण्याची मागणी गुरूप्रीत यांनी केली आहे. शिवाय या स्कीममधून कमावलेला पैसा सरकारकडे जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.शारदा चीटफंड घोटाळ्यात ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचे नाव पुढे आले होते. त्या वेळी प्रचारासाठी मिळालेले सर्व पैसे मिथुन यांनी सरकारला परत केले होते. त्यामुळे या घोटाळ्यातून पैसा कमावलेल्या कलाकारांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे गुरूप्रीत म्हणाले.