शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणातील आरोपीवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 01:29 IST

कटफळ (ता. बारामती) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुनाची धमकी देणारा आरोपी संतोष कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे.

बारामती : कटफळ (ता. बारामती) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुनाची धमकी देणारा आरोपी संतोष कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला जामीन मंजूर न करता कठोर शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज करण्यात आली. यानिमित्ताने महासंघासह विविध संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढला. महासंघाच्या या आंदोलनाला विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. नराधम आरोपी संतोष भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यावर यापूर्वीच कठोर कारवाई केली असती, तर अल्पवयीन मुलीवर हा प्र्रसंग ओढवला नसता. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर न करता कठोर शिक्षा द्यावी. पोलिसांनी तपासात कोणतीही कुचराई करू नये; अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यकांत गवळी, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंद गवळी, संघटक सुदाम लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गोरख ननवरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ पोटे, महिला प्रदेशाध्यक्ष सरोज भिसुरे, जिल्हा युवक अध्यक्ष विकास तिखे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा तिखे, बारामती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, संतोष आगवणे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे म्हणाले, की अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार केलेल्या सराईत आरोपीला कठोर शिक्षा करावी; अन्यथा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. या वेळी दलित विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष सुजय रणदिवे, शरद सोनवणे, संजय गायकवाड आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आरोपीला जामीन देऊ नये. आरोपीने केलेला गुन्हा समाजाला काळिमा फासणारा आहे. त्याला कडक शासन झाले पाहिजे, अशी सर्व दलित, आंबेडकरी विचारांच्या बांधवांची मागणी आहे. (वार्ताहर)>याशिवाय, या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने पोलिसांनी अटक केली. त्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा उजाळली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना कोणत्याही त्रुटी ठेवू नयेत. आरोपी सराईत आहे; त्यामुळे त्याला कठोर शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी केली. कोणत्याही मुलीवर, महिलांवर अन्याय-अत्याचार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत.