मुंबई : मराठवाडय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात अजूनही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे. तेव्हा वरच्या धरणांमधून जायकवाडीत तातडीने पाणी सोडा, अशी जोरदार मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाली.
शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या मुद्याला हात घातला. पाणी प्रश्नावरून आता वाद कशाला, असा प्रश्न दोन मंत्र्यांनी यावर केला. हा प्रश्न वादाचा नसून शेती आणि नागरिकांच्या गरजेचा आहे. वरची धरणो भरली आहेत. कालव्यांमध्येही पाणी असल्याने जायकवाडीला पाणी सोडण्यात काहीही अडचण नाही, याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले. त्यावर, संबंधितांची आपण तातडीने बैठक घेऊन तो निर्णय घेऊ, असे जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
पाऊस आणि पीकपाण्याची स्थिती या बाबत प्रशासनातर्फे मंत्रिमंडळाला माहिती दिली आणि राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडत असल्याबद्दल तसेच टँकरने पाणीपुरवठय़ाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांसाठी दिलेल्या सवलतींचा आढावा घेतला.
राज्यातील धरणो सरासरी 7क् टक्के भरली असली तरी मराठवाडय़ातील धरणांमध्ये 27 टक्केच पाणीसाठा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 74 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील नांदेड आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यात 26 ते 5क् टक्के. रायगड, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 18 जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर या 7 जिल्ह्यात 76 ते 1क्क् टक्के आण िठाणो, अहमदनगर, पुणो, सोलापूर, सातारा, सांगली होता. टँकर्सची संख्या देखील कमी झाली असून सध्या 35क् टँकर्स 3क्1 गावांना आणि 1441 वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळाला दिली. (विशेष प्रतिनिधी)
च्शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या मुद्याला हात घातला. वरच्या धरणांमधून जायकवाडीला तातडीने पाणी सोडले तर औरंगाबाद, परभणी, जालना आणि बीड या चार जिलंमधील शेतक:यांना पहिल्या रोटेशनचे पाणी लगेच देता येईल, असे आग्रही मत राजेंद्र दर्डा यांनी मांडले.