शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

मराठमोळ्या आमीरची मराठीसाठी तुफान बॅटिंग

By admin | Updated: August 14, 2014 14:50 IST

मराठी या विषयावर राजकारणासह समाजकारण ढवळून निघत असताना प्रख्यात सिनेअभिनेता आमीर खाननेदेखील मराठीसाठी तुफान बॅटिंग केली आहे

मुंबई : मराठी या विषयावर राजकारणासह समाजकारण ढवळून निघत असताना प्रख्यात सिनेअभिनेता आमीर खाननेदेखील मराठीसाठी तुफान बॅटिंग केली आहे. मराठीच्या वाढीसाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याबद्दल आमीरने राज्य सरकारसह मुंबई विद्यापीठाचे कान टोचले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभाग आणि ग्रंथालीच्या संयुक्त विद्यमाने ‘माय मराठी’ या संभाषणात्मक मराठी-१चे प्रकाशन आमीर खानच्या हस्ते झाले. त्या वेळी मराठमोळ्या भाषणात आमीर बोलत होता.विद्यापीठाच्या जर्मन विभागाने चांगला उपक्रम राबवला असून त्यात छोटा हातभार लावल्याचे तो म्हणाला. हे पुस्तक जगभरात मराठी शिकणाऱ्यांसाठी एक पर्वणी असेल. मात्र, जर्मन विभागाने राबवलेला हा उपक्रम राज्य सरकारकडून किंवा विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून का राबवण्यात आला नाही, असे म्हणत आमीरने सरकारसह विद्यापीठाचे कान टोचले. या सीरिजमधील अजून ५ पुस्तके बाकी असून त्यासाठी तरी राज्याच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घ्यावा, असे सांगून आमीर मोकळा झाला. मी अनेक वर्षांपासून सुहास लिमये यांच्याकडे मराठी शिकत आहे. मराठी ही राज्यभाषा असल्याने महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठीतच बोलायला हवे. मला मराठी न येणे ही माझ्यासाठी शरमेची गोष्ट होती. मात्र, आता त्यावर मात केल्याचेही तो म्हणाला. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, जर्मनचे कॉन्सुल जनरल मायकेल झिबर्ट, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. नरेशचंद्र, सुहास लिमये, विभा सुराणा उपस्थित होते. या पुस्तकाच्या निर्मितीत लेखक सुहास लिमये, दिवंगत जयवंत चुनेकर, गिरिजा गोंधळेकर, रूपा पुजारी, समन्वयक दीपक पवार, गिरिजा सावंत-टिळक, मानसी सावंत, कृत्तिका भोसले, माधुरी पुरंदरे, प्र. ना. परांजपे, सोनाली गुजर, मेहेर भूत, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, नीलेश गुप्ता यांचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)