शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

२६/११ मुंबई हल्ल्याप्रकरणी हेडलीला आरोपी करण्यास टाडा कोर्टाची परवानगी

By admin | Updated: November 18, 2015 21:02 IST

कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडली याला २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सहआरोपी बनवण्याची मुंबई पोलिसांची मागणी टाडा कोर्टाने मंजूर केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडलीला या हल्ल्याच्या खटल्यात सहआरोपी बनवण्याची मुंबई पोलिसांची मागणी मुंबई विशेष न्यायालयाने मंजूर केली आहे.
मुंबई हल्ल्याच्या सुनावणीसाठी हेडलीला 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे हजर करता यावे यासाठी अमेरिकी न्यायालयाकडून परवानगी मागणारे पत्र देण्याची विनंती मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने हेडलीविरोधात समन्स जारी करत १० डिसेंबर रोजी  'व्हिडिओ कॉन्फरन्सिग'च्या माध्यमातून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
 
सात वर्षांपूर्वी लष्कर -ए-तयब्बाच्या दहा दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर रोजी छत्रपटी शिवाजी टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे, ताज हॉटेल यासह अनेक मुंबईतील अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. या हल्ल्यात १६४ जण ठार झाले तर शेकडो जण जखमी झाले होते. पोलिसांनी नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले. 
या हल्ल्यासाठी हेडलीने मुंबई शहराची रेकी करून हल्ल्याचा संपूर्ण कट आखला होता. अमेरिकी नागरिक असल्याचे सांगत त्याने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निवासस्थानाचे फोटो काढले तसेच तेथील सुरक्षेचा आढावाही घेतला होता. 
अमेरिकेतील शिकागो कोर्टाने हेडलीला ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून तेथून मुक्त झाल्यावरही त्याच्यावर आजीवन देखरेख ठेवण्यात येणार आहे.