शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

⁠पंढरपुरात होडी जाळताना तलाठीही भाजले

By admin | Updated: May 6, 2016 19:17 IST

भीमा नदी पात्रातून छुप्या पध्दतीने वाळु उपसा व वाहतुक करणाऱ्या होड्या जाळताना महसुल विभागाचे तीन कर्मचारी भाजले आहेत. या भाजलेल्या कर्मचाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. ६  : येथील इसबावी परिसरातील भीमा नदी पात्रातून छुप्या पध्दतीने वाळु उपसा व वाहतुक करणाऱ्या होड्या जाळताना महसुल विभागाचे तीन कर्मचारी भाजले आहेत. या भाजलेल्या कर्मचाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतला आहे.इसबावी कंडरे तालीम जवळील पाणीपुरवठा योजना परिसरातून अवैद्य वाळु उपसा सुरु असतो. वाळु उपसा करुन वाळु पोत्यामध्ये भरुन ती होडीद्वारे नदीच्याकडेला आणून विकली जाते. यामुळे तहसिलदार नागेश पाटील व मंडल अधिकारी बालाजी पुदलवार, मंडल अधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी विजय जाधव, रणजित मोरे, बाळू मोरे, रवी शिंदे व एस. बी. कदम त्या होडींवर कारवाई करण्यासाठी गेले होते.यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पथकाच्या हाती फक्त होड्याच आल्या, होडी चालक मात्र त्याठिकाणावरुन फरार झाले. यामुळे महसुल विभागाच्या या पथकाने त्याठिकाणी सापडलेल्या ६ होड्या जाळण्याचे व जे.सी.बी.च्या साहाय्याने तोडण्याचे ठरविले.यावेळी उपस्थित तलाठ्यानी त्या होड्यावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र या पथकातील तलाटी कदम यांच्या पायावर नकळत पेट्रोल पडले. ते होडी पेटवत असताना त्यांच्या पायावरील पेट्रोलने पेट घेतला. यामध्ये त्यांचे दोन्ही पाय भाजले. तसेच पंढरपूर मंडल अधिकारी बालाजी पुदलवार व तहसिलदारांच्या गाडीचे चालक घाडगे यांना थोड्याप्रमाणात भाजले आहे. यासर्वांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतला आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार दिली नाही. यामुळे ही अर्धवट कारवाईवर नागरीकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.