शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

प्रचारमंत्रचे तंत्र

By admin | Updated: September 28, 2014 01:38 IST

निवडणुका लढायच्या म्हटल्या की, प्रचाराचे हत्यार जवळ हवेच. या प्रचाराच्या जोरावर मतदारांर्पयत पोहोचता येते. महाराष्ट्र सध्या निवडणुकीच्या तोंडावर उभा आहे.

सोशल नेटवर्किग प्रचाराचं  ‘वजीर’ माध्यम
 
माधव शिरवळकर
 
निवडणुका लढायच्या म्हटल्या की, प्रचाराचे हत्यार जवळ हवेच. या प्रचाराच्या जोरावर मतदारांर्पयत पोहोचता येते. महाराष्ट्र सध्या निवडणुकीच्या तोंडावर उभा आहे. पुढचे दहा दिवस प्रचाराची अक्षरश: राळ उडणार आहे. लढती बहुरंगी होत असल्याने प्रचार शिगेला जाणार यात शंका नाही. प्रचाराची ही माध्यमे गेल्या काही वर्षात प्रचंड बदलली. नव्या तंत्रज्ञानाने लोकांर्पयत पोहोचता येते, हे गेल्या लोकसभा निवडणुकीनेही दाखवून दिले. कसा होता कालचा प्रचार आणि कुठे पोहोचला तो.. 
त्याचा हा धांडोळा..
 
तुटपुंज्या वेळात चटकन आणि प्रभावीपणो मतदारांर्पयत पोहोचायचं तर सोशल नेटवर्किगच्या तोडीचं दुसरं कोणतंही माध्यम नाही. बुद्धिबळाच्या खेळात वजिराचं जे स्थान आहे ते माध्यमांमध्ये सोशल नेटवर्किगचं आहे. प्रिंट (वृत्तपत्रे, नियतकालिके, छापील साहित्य), इलेक्ट्रॉनिक मीडिया (टेलीव्हिजन वाहिन्या, केबल) या दोन्ही प्रमुख माध्यमांचे सारे गुण सोशल नेटवर्किगच्या इंटरनेट माध्यमात एकवटलेले आहेत.
 
जकीय पक्षांना आणि एकूणच संभाव्य उमेदवारांना प्रचारासाठी मिळालेला अत्यंत तुटपुंजा वेळ हा राज्यात 15 ऑक्टोबरला होणा:या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. इंग्रजीत ज्याला ‘पॅराडाइम शिफ्ट’ (म्हणजे परिस्थितीतील अचानक बदल) असं म्हटलं जातं तो महाराष्ट्रात घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी झाला. चार मुख्य राजकीय पक्षांच्या समोर युती आणि आघाडीच्या फुटीमुळे प्रचाराची पारंपरिक शैली व धोरणं अचानक बदलण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. यात दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक तर फुटीपूर्वी केलेला विचार, युती/आघाडी आहे, असं गृहीत धरून ठरवलेले डावपेच आणि धोरणं ही लिहिलेला कागद फाडून टाकावा तशी ठरलेली आहेत. नवे डावपेच, नवी धोरणं, नवे मुद्दे शोधायला, त्यावर विचार करायला हातात वेळ नाही, तशात समोर पंचरंगी सामन्यांचं आव्हान पुढे ठाकलेलं आहे, अशा स्थितीतून जाताना पक्ष आणि उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. 
महाराष्ट्रात 2क्14च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूणच तरुण मतदारांची संख्या फार मोठी आहे. हा तरुण मतदार उदासीन नाही, या महत्त्वाच्या मुद्दय़ाची नोंद सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. तरुण मतदार हा पारंपरिक पद्धतीने एक पक्ष ठरवून डोळे झाकून मतदान करणारा नाही. त्याला पटलं तर तो केव्हाही आपला पक्ष बदलून आपलं मतदान फिरवू शकतो, ही बाब निवडणूक निकालावर थेट परिणाम करणारी आहे, हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. तशात पंचरंगी सामन्यांमुळे होणारी एकूण मतांची विभागणी पाहता निवडून येणारा उमेदवार हा अगदी मोठय़ा मतदारसंघातही सरासरी 1,5क्क् ते 3,5क्क् मतांनी निवडून येणार आहे. अशा स्थितीत उपलब्ध सोशल नेटवर्किग (इंटरनेटवरील) माध्यमांचा उपयोग परिणामकारकपणो करावा आणि तरुणाईला त्याद्वारे अधिकाधिक प्रभावित करून महाराष्ट्रातली निवडणूक जिंकावी, हा महत्त्वाचा डावपेच सर्वच राजकीय पक्षांना राबवावा लागणार आहे. उपलब्ध तुटपुंज्या वेळात चटकन आणि प्रभावीपणो मतदारांर्पयत पोहोचायचं तर सोशल नेटवर्किगच्या तोडीचं दुसरं कोणतंही माध्यम नाही.
बुद्धिबळाच्या खेळात वजिराचं जे स्थान आहे ते माध्यमांमध्ये सोशल नेटवर्किगचं आहे. प्रिंट (वृत्तपत्रे, नियतकालिके, छापील साहित्य), इलेक्ट्रॉनिक मीडिया (टेलीव्हिजन वाहिन्या, केबल) या दोन्ही प्रमुख माध्यमांचे सारे गुण सोशल नेटवर्किगच्या इंटरनेट माध्यमात एकवटलेले आहेत. साधं व्हॉट्सअॅपचं उदाहरण घ्या. तिथे लहान-मोठा मजकूर, लेख, छायाचित्रे, ध्वनिक्षेपण (म्हणजे रेकॉर्डेड भाषणो, चर्चा) तसेच विविध प्रकारची चलतचित्रे म्हणजे अॅनिमेशन वा व्हिडीओ क्लिप्स/फिल्म्स सर्वच एकत्र उपलब्ध आहेत. हे सारं एका क्षणात मतदाराच्या मोबाइल फोनवर पोचतं. तुमचा संदेश जर कमालीचा प्रभावी असेल तर तो पुढल्या क्षणी ‘व्हायरल’ होतो. म्हणजे एकाकडून दुस:याकडे, दुस:याकडून तिस:याकडे असं होत क्षणार्धात लाखो लोकांर्पयत पोहोचतो. जो पक्ष वा उमेदवार असा ‘व्हायरलक्षम’ मजकूर, चित्रे, चलतचित्रे वगैरे स्वत:च्या प्रचारासाठी प्रभावीपणो राबवेल त्याला विजयाची आशा सर्वात अधिक असेल.
एकेकाळी झोपडपट्टय़ांमध्ये पैसे, दारू, महिलांना साडय़ा वाटल्या जायच्या. एकेक वस्ती अशा प्रकारे खरेदी केली की निवडणूक जिंकता येते, असा समज होता. पण त्या डावपेचांना कुठल्या कुठे मागे टाकू शकेल आणि निवडणूक जिंकून देऊ शकेल, अशी क्षमता आता सोशल नेटवर्किगच्या प्रभावी माध्यमामध्ये आज आलेली आहे. एक लक्षात घ्यायला हवं की प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही प्रमुख माध्यमांमध्ये ‘व्हायरल’ होण्याची आणि इंटेरॅक्टिव्हिटिची (म्हणजे तात्काळ प्रतिसाद स्वीकारण्याची) क्षमता नाही. व्हॉट्सअॅपसारख्या किंवा फेसबुकसारख्या माध्यमामध्ये एखादा संदेश मिळाला की लगेच त्यावर उलटसुलट मतप्रदर्शनास सुरुवात होते. त्याचा प्रभाव फार मोठा असतो. ही क्षमता ना वृत्तपत्रंमध्ये आहे, ना टीव्ही वाहिन्यांमध्ये. सोशल नेटवर्किगची ही बाब अगदी चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकांनी ‘लाइटली’ घेतली होती. भाजपाने मात्र या माध्यमाचा उपयोग लोकसभा निवडणुकीत अक्षरश: अणुबॉम्बसारखा केला आणि केंद्रात बहुमत ओढून आणलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सोशल नेटवर्किग माध्यमाचा उपयोग करण्यात भाजपाच्या तुलनेत खूपच कमी पडले, ही बाब त्यांच्या पक्षाचे नेते आता जाहीरपणो बोलून दाखवतात. ती चूक ते विधानसभा निवडणुकीत सुधारू पाहतील, यात शंकाच नाही. परंतु त्यांच्या हातात आता वेळ कमी आहे आणि बदललेली परिस्थिती आव्हान अधिक अवघड करणारी आहे.
 
अगदी चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकांनी सोशल नेटवर्किगला ‘लाइटली’ घेतले होते. भाजपाने 
मात्र या माध्यमाचा उपयोग अक्षरश: अणुबॉम्बसारखा केला 
आणि केंद्रात बहुमत ओढून आणलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सोशल नेटवर्किग माध्यमाचा उपयोग करण्यात भाजपाच्या तुलनेत खूपच कमी पडले, ही बाब त्यांच्या पक्षाचे नेते आता जाहीरपणो बोलूनही दाखवतात.
 
निवडणूक, तरुण मतदार अन् विजयी होण्याची शक्यता..
2009 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तपशीलवारपणो उपलब्ध आहेत. एक उदाहरण म्हणून आपण त्यातला ठाणो मतदारसंघ घेऊ. 2क्क्9 मध्ये तिथे एकूण 3,क्7,24क् मतदार होते. त्यापैकी 1,58,312 जणांनी प्रत्यक्ष मतदान केले. त्या वेळी तिरंगी लढती होत्या.
 
तिरंगीपैकी दोन, युती आणि आघाडी होत्या. तिसरा रंग मनसेचा होता. मनसेचा भर तरुणाईवर अधिक होता. झालेल्या एकूण मतदानापैकी 32.22 टक्के शिवसेना-भाजपा युतीला, 3क्.68 टक्के मनसेला आणि 22.92 टक्के मते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अशी एकूण सुमारे 86 टक्के मते प्रमुख पक्षांना मिळाली होती.
 
उरलेली 14 टक्के मते बीएसपी, आरपीआय (आ), अपक्षांना मिळाली होती. युती आणि आघाडी फुटल्याने 22.92 + 32.22 म्हणजे एकूण 55.14 टक्के मते आता चार पक्षांमध्ये विभागली जातील. गेल्या खेपेस ठाणो मतदारसंघातला शिवसेना-भाजपा युतीचा विजयी उमेदवार मनसेच्या उमेदवाराचा 2,441 मतांनी पराभव करून निवडून आला होता आणि तिस:या क्रमांकावर असलेल्या काँगेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराने 36,288 मते मिळवली होती.
 
युती, आघाडी, आणि मनसे अशी तिरंगी लढत असताना उमेदवार 2,441 मतांनी निवडून येतो तर पंचरंगी लढत असताना काय होईल याचा अंदाज सहजपणो बांधता येईल. त्यातही तेव्हा मनसेला पडलेली तरुणाईची मते काही प्रमाणात जरी इकडे-तिकडे झाली तरी निकाल या टोकावरून त्या टोकाला झुकू शकतो.
 
अशा स्थितीत ज्या उमेदवाराची प्रभावी, बोलकी व अपडेट होत जाणारी वेबसाइट आहे, ज्याचा यू टय़ुबवर स्वतंत्र चॅनेल आहे, ज्याच्या फेसबुक अकाउंटमध्ये लोकांची गर्दी असते, जो काही ना काही प्रभावी टि¦ट्स करीत असतो, ज्याच्याकडे अत्यंत प्रभावी असे व्हायरल होऊ शकणारे (विशेषत: मराठी भाषेतले) व्हॉट्सअॅप मेसेजेस आहेत, वा तसे मेसेजेस उमेदवाराच्या नावे तयार करणारी तरबेज माणसे आहेत, जो काळाची चाल ओळखून झोपडपट्टय़ांमध्ये पैसे वाटण्यापेक्षा सोशल नेटवर्किगवर अधिक खर्च करीत आहे, असा उमेदवार महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत तरुणांची मते बहुसंख्येने मिळवून विजयी होण्याची शक्यता अधिक आहे.