शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राच्या माध्यमातून अभ्यासक्रम

By admin | Updated: June 27, 2016 02:23 IST

ठाणे शहरामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ठाणे : ठाणे शहरामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ठाणे येथील मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातंर्गत बहि:शाल विभाग सुरू करण्याची मागणी महापौर संजय मोरे यांनी मंगळवारी केली.बाळकूम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची पाहणी महापौरांनी केली. यावेळी सभागृह नेत्या अ‍ॅड. अनिता गौरी, माजी सिनेट सदस्य महादेव जगताप उपस्थित होते. यावेळी या उपकेंद्राच्या केंद्रप्रमुख डॉ. प्रसाद कर्णिक, सहाय्यक कुलसचिव सुखदा धोत्रे व प्रा. गावित यांचेशी महापौरांनी चर्चा केली.सध्या या ठिकाणी बीएमएस व एमबीए हे दोन अभ्यासक्र म सुरू असून याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असे दोन अभ्यासक्र म सुरू करणारे ठाणे हे पहिले शहर आहे. याच धर्तीवर प्रवेशापासून वंचित असलेले दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी आयडॉल सेंटर सुरू करावे, ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टूरिझम, वैद्यकीय अभ्यासक्र म तसेच गरवारे इन्स्टिीट्यूट मधील आवश्यक अभ्यासक्र म सुरू करावेत. शिवाय मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेले इतरही अभ्यासक्र म चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करावेत, रत्नागिरीच्या धर्तीवर रेल्वे रिसर्च सेंटर सुरू करण्याची मागणी यावेळी महापौर यांनी केली. याबाबत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचीही भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)या व्यतिरिक्त परिक्षेत्राअंतर्गत उपलब्ध असलेल्या जागेत वसतीगृह उभारणे तसेच आवश्यक मूलभुत सेवा सुविधा उपलब्ध करु न देणे व येथील समस्या तातडीने सोडविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. उपकेंद्राअंतर्गत आवश्यक असलेले प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने भरती करणेबाबतचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी संगणक कक्ष, वर्ग खोल्या, लायब्ररी याचीही पाहणी केली.