शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची तलवार म्यान

By admin | Updated: November 14, 2015 01:14 IST

महापौर निवड : चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला ‘यू टर्न’; विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणार

कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भरवशावर अवलंबून राहिलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी अचानक ‘यू टर्न’ घेत महापौरपदाच्या निवडणुकीत आपली ‘तलवार म्यान’ केली. गेले काही दिवस महापौर-उपमहापौर निवडणुकीत चमत्कार घडविण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी आता महापालिका सभागृहात भाजप-ताराराणी आघाडीने एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचे उपमहापौर होण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला भाजप किंवा ताराराणी आघाडीचा महापौर करण्यासाठी मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या जोरावर आम्ही ‘चमत्काराची भाषा’ केली होती; परंतु गुरुवारी त्यांनीच आता हे अशक्य असल्याचा निरोप पाठविला. त्यामुळे भाजप व ताराराणी आघाडीने महानगरपालिका सभागृहात ‘विरोधी पक्ष’ म्हणून भूमिका बजावण्याचे ठरविले आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे ४४ इतके संख्याबळ आहे, तर शिवसेनेचे चार नगरसेवक धरून भाजप-ताराराणी आघाडीकडे ३७ नगरसेवक आहेत. संख्याबळाचा विचार करता काँग्रेस व राष्ट्रवादीचे महापौर-उपमहापौर होणार हे स्पष्ट असतानाही आठ दहा दिवसांपासून पालकमंत्री ‘भाजपचाच महापौर होईल’, असे ठामपणे सांगत होते; परंतु शुक्रवारी अचानक त्यांनी महापालिका सभागृहात भाजप-ताराराणीचे नगरसेवक एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून आपली भूमिका बजावतील, असे सांगून टाकले. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. महानगरपालिकेतही सत्तेपर्यंत पोहोचण्यात अगदी काही जागा कमी पडल्या म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे सहकार्य मागितले होते. महानगरपालिकेत आम्ही सत्तेवर आलो तर शहराच्या विकासात अधिक सुसूत्रता आणि सोपेपणा येईल, एवढ्या एकाच हेतूने राष्ट्रवादीकडे सहकार्य मागितले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व माझे बोलणेही झाले होते. त्यांनी सहकार्य करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु काल त्यांनी अचानक राष्ट्रवादीने भाजपला किंवा ताराराणी आघाडीला सहकार्य करणे शक्य नाही, असा निरोप पाठविला. त्यामुळेच आम्ही भाजपचा महापौर करण्याची चर्चा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहात आमचे नगरसेवक प्रबळ विरोधक म्हणून भूमिका बजावतील. एक दबावगट म्हणून काम करतील. घोडेबाजार ही आमची संस्कृती नव्हे महापालिकेत नगरसेवकांना फोडून घोडेबाजार करणे ही आमची संस्कृती नाही. आम्हाला तसे करायचेही नाही. आमच्या चमत्कारात घोडेबाजार बसत नाही. ‘ताराराणी’चा महापौर करावा, आम्ही बाहेर थांबतो असा शेवटचा प्रस्ताव आम्ही राष्ट्रवादीकडे दिला होता. भाजप बाहेर थांबल्यास ते मदत करतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यासही नकार दिला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकत्रित १५ नगरसेवक येणार नसतील तर आपण विरोधी पक्षात बसावे, अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो. कोणावर दबाव टाकण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न आमच्याकडून होणार नाही, असे पाटील म्हणाले. श्रेयवादाचा विषय रंगणार यापुढच्या काळात श्रेयवादाचा विषय चांगलाच रंगणार आहे, असे सांगून पालमंत्री पाटील म्हणाले की, कालच आम्ही शहर विकासातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत २६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. आता त्यास महानगरपालिकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ लागणार आहे. मनपा ते देणार की नाही; असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही २० कोटींचा निधी आणला तर तो खर्च करण्यासाठी याच मंडळींनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात राजकारण केले. अडथळे आणले म्हणूनच आम्हाला भीती वाटते की पुढील काळात श्रेयवादाचा विषय होईल. १०० कोटींचा निधी थांबला रंकाळा सुशोभिकरणाचा १०८ कोटींचा प्रस्ताव तयार आहे. त्यापैकी मिळालेल्या आठ कोटींच्या निधीचा हिशेब दिला नाही म्हणून पुढील १०० कोटींचा निधी यायचा थांबला आहे. महापालिकेच्या अशा असहकार्यामुळे विकासकामांवर परिणाम होणार आहे. राजकारणात हा फरक राहणार आहे. ज्या पक्षाची सत्ता येईल, त्यांनी शहराचा विकास करण्यावर जोर द्यावा. आम्ही त्यासाठी मुंबई, दिल्ली फेऱ्या मारणार नाही तरीही आम्ही काँग्रेसला चांगल्या कामात नेहमी सहकार्य करू . विकासात राजकारण करणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. खाई त्याला खवखवे ‘आम्ही चमत्काराची भाषा’ केली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘आम्हाला घोडेबाजार करू नका,’ म्हणून आवाहन करण्यास सुरुवात केली. ‘खाई त्याला खवखवे’ असं म्हणतात. वर्षानुवर्षे ज्यांनी घोडेबाजार केला त्यांनीच अशी भीती व्यक्त करावी; असे आवाहन करावे त्याचे आश्चर्य वाटते. सत्तेसाठी आम्हाला एवढा आटापिटा कशासाठी करता, असे विचारले जात आहे. मग तुमचा तरी का एवढा आटापिटा चालला आहे, असा सवाल पालकमंत्र्यांनी केला. पत्रकार परिषदेस महानगर जिल्हाध्यक्ष महेश सावंत, आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक, सुनील मोदी, सुनील कदम, सत्यजित कदम, सुहास लटोरे आदी उपस्थित होते. महापौरपदाची निवडणूक भाजप लढविणार महानगरपालिकेतील सत्तेचा राजदंड हाती