शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घुमानची रेल्वे फुल

By admin | Updated: March 3, 2015 01:20 IST

पंजाबातील घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून सोडण्यात येणाऱ्या रेल्वेंचे बुकिंग पूर्ण झाले आहे.

पुणे : पंजाबातील घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून सोडण्यात येणाऱ्या रेल्वेंचे बुकिंग पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून या संमेलनासाठी ५ ते ७ हजार रसिक येतील, असा विश्वास संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी सांगितले.घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या नियोजनासंदर्भात देसडला आणि संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या संमेलनासाठी एक रेल्वे नाशिक येथून, तर दुसरी रेल्वे मुंबईतून सोडण्यात येणार आहे. वसईतून रेल्वे सोडण्याचे निश्चित झाले होते; पण रसिकांची गैरसोय लक्षात घेऊन ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येऊन सोडण्यात येणार आहे. तर, दुसरी रेल्वे नाशिक येथून सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. घुमान येथील नागरिकांमध्ये संमेलनाविषयी उत्सुकता असल्याते ते म्हणाले.रसिकांसाठी प्रश्नमंजूषा४संयोजन समितीच्या वतीने प्रश्नमंजूषा घेण्यात येणार आहे. पहिले अ. भा. मराठी साहित्य संमेलन कोठे व कोणत्या वर्षी झाले? पहिल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? ‘बालकवी’ नावाने कोणाला ओळखले जाते? ८८व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कोण आहेत? हे पाच प्रश्न आहेत. यातून विजेत्या २५ स्पर्धकांची निवड करून लकी ड्रॉद्वारे ५ जणांची निवड केली जाणार असून, त्यांना संयोजकांच्या वतीने घुमानला नेण्यात येईल, असे सुधीर शिंदे यांनी सांगितले.प्रकाशकांबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्तातघुमान येथे मराठी भाषक व्यक्ती नसल्याने पुस्तकविक्री होणार नाही, म्हणून प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसा ठराव प्रकाशकांच्या संघटनेने केला होता. त्यानंतर साहित्य महामंडळाने पुन्हा चर्चेसाठी हात पुढे करून हैदराबाद येथील महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. हैदराबाद येथे बैठक झाली; पण निर्णय अद्याप कळलेला नाही. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी १५ प्रकाशकांनी संमेलनासाठी नोंदणी केल्याचे सोमवारी सांगितले; पण नावे मात्र सांगितली नाही. महामंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला आहे, हे प्रकाशकांनाही अद्याप समजलेले नाही.मराठी भाषक लोक नसल्याने घुमानला किती लोक येतील, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित करण्यात येत होता. पण, लोकांचा प्रतिसाद बघता संमेलनास ६ ते ७ हजार लोक येतील, अशी खात्री वाटत आहे. पुणे आणि मुंबईतून खासगी बसनेही काही लोक येणार आहेत. नांदेडच्या नानक फाउंडेशनतर्फे १५० जणांचे पथक, तर इचलकरंजीतून २५० जण येणार आहेत.- भारत देसडला, स्वागताध्यक्ष