शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूचा कहर सुरूच!

By admin | Updated: March 6, 2015 01:42 IST

बुलडाण्यात संशयीत रूग्णाचा मृत्यू, अकोल्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू स्वाईन फ्लूनेच.

अकोला : पश्‍चिम विदर्भात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलडाणा जिल्ह्यात एका स्वाईन फ्लू संशयित रूग्णाचा मृत्यू बुधवारी झाला. दरम्यान, संशयित रूग्ण म्हणून सोमवारी मरण पावलेल्या अकोल्यातील एका महिलेचा बळी स्वाईन फ्लूनेच घेतल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील रहिवासी सुनील सदाशिव साळवे (४६) हे येवती येथील एका शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली रायगाव येथील हायस्कुलवर झाली होती. दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे २६ फेब्रुवारीपासून ते रजेवर होते. मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते; परंतू प्रकृती खालावल्याने त्यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ४ मार्च रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. साळवे यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, स्वाइन फ्लूचा संशयित रूग्ण म्हणून सोमवारी रात्री मृत्यूमुखी पडलेल्या अकोला शहरातील महिलेचा बळी स्वाइन फ्लूनेच घेतला असल्याचे गुरूवारी वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. आकोट फैलमधील इंदिरानगर येथील रहिवासी ज्योती रवि बल्लाळ (४0) हिला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यांचा वैद्यकीय अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. त्यानुसार त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे आता तीन बळी झाले आहेत. नागरिक स्वाइन फ्लूमुळे दहशतीत असून, आरोग्य विभागाच्यावतीने मात्र प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र दिसत आहे.