शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची तडकाफडकी बदली

By admin | Updated: August 13, 2016 03:09 IST

बदलापूर येथे तब्बल सहा तास चाललेल्या आंदोलनाची दखल थेट दिल्लीत असणाऱ्या रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आणि या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे

मुंबई : बदलापूर येथे तब्बल सहा तास चाललेल्या आंदोलनाची दखल थेट दिल्लीत असणाऱ्या रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आणि या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांची तडकाफडकी बदली केली. ही बदली करतानाच त्याच्या आदेशाची प्रत संध्याकाळपर्यंत मध्य रेल्वेकडे पाठविण्यात आली. ओझा यांनी मध्य रेल्वेवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून अठरा महिने काम पाहिले. अमिताभ ओझा यांची बदली दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील गुंटूर रेल्वे विभागात करण्यात आल्याचे समजते. लोकल वीस मिनिटे उशिराने आल्याने प्रवाशांकडून बदलापूर स्थानकात सकाळच्या सुमारास तब्बल सहा तास उत्स्फुर्त आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांना घटनास्थळी पाठविले आणि प्रवाशांच्या समस्या ऐकूण घेण्याची सूचना केली. मात्र प्रवाशांचा उद्रेक आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वेचा उडणारा बोजवारा पाहता विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात दिल्लीत रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर ओझा यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. ओझा हे इंडियन रेल्वे सर्व्हिसमधील इलेक्ट्रीकल इंजिनियर आहेत. मुंबईतील लोकल हाताळण्यासाठी रेल्वेचा वाहतुक विभागातील अधिकारी हवा, असे म्हणणे मांडत ओझा यांची बदली करण्यात आली. त्याऐवजी ओझा यांच्या जागी बिलासपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक रविंद्र गोयल यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. ओझा यांची बदली करण्याचे आदेश हे संध्याकाळी पाचच्या दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाकडे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र ओझा यांचा आंदोलनाशी संबंध नसतानाही त्यांच्या झालेल्या बदलीमुळे रेल्वे अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)- अमिताभ ओझा यांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक पदाचा कार्यभार जवळपास अठरा महिने सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात दिवा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी प्रवाशांकडून झालेले आंदोलन तसेच हँकॉक पुल तोडल्यानंतर सॅन्डहर्स्ट रोड येथील आंदोलनाबरोबरच आता बदलापूर येथील आंदोलनही झाले. - मध्य रेल्वेवर येणारे नविन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांना मुंबईतील पश्चिम व मध्य रेल्वेवरील सेवेचाही प्रदीर्घ अनुभव आहे.