शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

थंडीच्या कडाक्यात आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटरची ऊब

By admin | Updated: November 16, 2016 08:55 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना नव्या ऊबदार स्वेटरचे दान फाऊंडेशनतर्फे मोफत वाटप करण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यातच ऊब मिळाल्याचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.

ऑनलाइन लोकमत पेठ, दि. १६ - बालदिनाचे औचित्य साधत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील तोरंगण (ह.), हरसूल, वायघोळपाडा, सारस्ते, जातेगाव, दलपतपूर, निरगुडे, चिंचवड, सापतपाली, चिखलपाडा, हट्टीपाडा येथील इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंतच्या ५०० आदिवासी विद्यार्थ्यांना नव्या ऊबदार स्वेटरचे दान फाऊंडेशनतर्फे मोफत वाटप करण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यातच ऊब मिळाल्याचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.

विशेष म्हणजे हरसूल परिसरातील जवळपास सर्वच खेड्या-पाड्यावर दान फौंडेशनतर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवाय अलिकडेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या, पाटी, पेन, पेन्सिल देखील देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लावला होता. अलिकडे वाढत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व परिणामी शालेय पटावर देखील याचा मोठा विपरीत परिणाम होत असतो.

या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दान फौंडेशनचे शर्मा व नीलेश शर्मा यांच्या संकल्पनेतून परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत ऊबदार स्वेटर उपलब्ध करून दिले. तर पुढील काळात उर्वरित विद्यार्थी व जनसामान्यांना श्वेटर उबलब्ध करून देणार असल्याचा मानस व्यक्त केला.

हरसूल येथील स्वेटर वाटप झाल्यानंतर जवळच असलेल्या गडदवणे पाड्यावर आदिवासी महिला, पुरुष व बाल-गोपालांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी दान फौंडेशन नाशिक व चक्र धर स्वामी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या आयोजित कार्यक्रमप्रसंगी शर्मा , मीना शर्मा, हेमलता शर्मा, विजयकुमार शर्मा, अविनाश देव, ज्ञानेश्वर भुजबळ, नितीन सोनवणे यांच्यासोबतच रवींद्र भोये, विनायक माळेकर, डॉ. रघुनाथ भोये, भोसले साहेब , आदींसह परिसरातील शेकडो विद्यार्थी , पालक , शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. दान फौंडेशन नाशिक व चक्र धर स्वामी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या या समाजसेवी कार्याचे परिसरातून विद्यार्थी- पालक- शिक्षक यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे.