शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरीवर शपथ; भाजपात गटबाजी

By admin | Updated: March 4, 2017 01:18 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली.

जुन्नर : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे गटाचेच नगरसेवक उपस्थित होते. अन्य गटांच्या नगरसेवकांनी दांडी मारल्याने भाजपातील गटबाजी उघड झाली आहे.शिवनेरी किल्ल्यावर शुक्रवारी शपथ ग्रहण कार्यक्रम झाला. या वेळी आमदार लांडगे यांच्यासोबत आळंदी नगरपालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील ४१ नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांना शिवनेरी गडावर निष्ठा व प्रामाणिकपणाची शपथ दिली.दरम्यान, शिवाजीमहाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी गटावरील शिवाई मातेच्या मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर ज्येष्ठ पदाधिकारी विजय फुगे यांनी आळंदी नगर परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांना एकनिष्ठता आणि प्रामाणिक कारभाराची शपथ दिली. आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘भोसरीच्या विकासासाठी व्हिजन-२०२० हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. भोसरीचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने कटिबद्ध राहावे. तसेच विकासाच्या मुद्द्यावर भाजपा आणि आमदार महेश लांडगे यांच्यासोबत निष्ठेने काम करावे. नागरिकांना दिलेला प्रामाणिक कारभाराचा शब्द पूर्ण करावा. यासाठीच ही शपथ देण्यात आली आहे.’’आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ऐतिहासिक कुसूर गावातील विकासकामांची पाहणी करण्यात आली. दरम्यान या उपक्रमास केवळ आमदार लांडगे गटाचेच नगरसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)