शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा शपथविधी बहुधा 22 ला!

By admin | Updated: May 18, 2014 00:54 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी 22 मे रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली

यदु जोशी/ गजानन जानभोर 
- नवी दिल्ली
केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी 22 मे रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली. मुहूर्त पाहून शपथविधी करावा, असा सल्ला देशातील सात नामांकित ज्योतिषांनी मोदी यांना दिला आहे. 
भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक शनिवारी दुपारी येथे झाली. त्यात शपथविधीच्या तारखेबाबत विचार झाला. त्यानुसार येत्या गुरुवारी म्हणजेच 22 तारखेला शपथ घ्यावी, असे सुचविण्यात आले.  
ज्योतिषांनी 22 आणि 23 तारखेचे काही मुहूर्त मोदींना 
सांगितले आहेत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिका:याने त्याला एका नामांकित ज्योतिषाकडून आलेला मुहूर्ताचा कागद भाजपाच्या नेत्यांकडे पाठविला असल्याची माहिती आहे. वाराणशीमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठीही मोदींना विशिष्ट मुहूर्ताचा सल्ला ज्योतिषांनी दिलेला होता, पण त्यांनी तो मानला नव्हता. 
भाजपाला जे अभूतपूर्व यश मिळाले ते बघता मंत्रिमंडळाचा शपथविधी राष्ट्रपती भवनाऐवजी खुल्या जागेत, मोठय़ा सभागृहात वा स्टेडियममध्ये व्हावा, अशीही सूचना समोर आली आहे. 
मोदींना देणार निरोप
सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहून आता देशाचे पंतप्रधान होत असलेल्या नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी गुजरात विधानसभेचे खास अधिवेशन येत्या बुधवारी 21 मे रोजी भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनात मोदींचे आभार मानणारा ठराव संमत करण्यात येईल.