शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्यायच झाला - नितीन गडकरी

By admin | Updated: February 26, 2017 23:03 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा निश्चितच मौलिक होता. त्याग, समर्पण, देशभक्ती यांचे ते परमोच्च उदाहरण होते.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा निश्चितच मौलिक होता. त्याग, समर्पण, देशभक्ती यांचे ते परमोच्च उदाहरण होते. त्यांची निष्ठा, लेखन, साहित्य, समाजकार्य, विचार आणि वक्तृत्व यांना तोडच नव्हती. मात्र आपल्या देशात सावरकर अनेकांना समजलेच नाहीत. त्यांच्यावर सातत्याने अन्यायच झाला, अशी खंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते.सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक तरुणांचे स्फुल्लिंग जागृत केले. सोबतच त्यांनी हिंदुत्वाची सर्वसमावेशक व्याख्या केली. समाजातील जातीय भेदाभेद दूर व्हावा यासाठी ते झटले. मात्र स्वातंत्र्याअगोदर व नंतरही त्यांची उपेक्षाच झाली. म्हणूनच त्यांना वेळोवेळी विरोध झाला. मात्र जर सावरकर देशभक्त नसतील, तर देशात एकही देशभक्त नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. सावरकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आतापर्यंत दुर्दैवाने त्यात हवे तसे यश आलेले नाही. सावरकरांच्या विचारांचा हिंदूधर्मातील लोकांनी आदर केला असला तर आज देशाचे सामाजिक चित्र हे फार वेगळे व सुधारणावादी असते. सावरकरांच्या विचारांतील हिंदुत्व हे देशाच्या भविष्याचे राष्ट्रीयत्व आहे. नवीन पिढ्यांपर्यंत सावरकरांचे विचार पोहोचविले पाहिजेत, असे आवाहन गडकरी यांनी केले.