शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटना सदभाऊंना विचारणार जाब

By admin | Updated: June 28, 2017 19:32 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील प्रमुख नेते असलेल्या राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 -  पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे.  यसाठी  एका समितीची स्थापना केली असून, या समितीसमोर सदाभाउंना बाजू मांडण्यासाठी  ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर सदाभाऊ यांचा फैसला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिले.  स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधे राहणार की नाही याबाबत २५ जुलैनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. या वेळी पत्रकारांना माहिती देताना शेट्टी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘  सदाभाऊ  खोत यांची भूमिका येथून  पुढे स्वाभिमानीची अधिकृत मानली जाणार नाही. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष डॉ.  प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भुमिका मांडतील.’’
 सरकारनी जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद हे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरुन ध्यानात आले आहे असे सांगुन शेट्टी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या  मोठ्या प्रमाणात जर शेतकºयांना लाभ होत असेल तर शेतकर्यांमधे एवढा असंतोष का आहे? एका बाजुला मुख्यमंत्री दावा करतात की राज्यावर प्रतिमाणसी सरासरी ५४ हजार रुपयांचे कर्ज आहे. परंतु ती आकडेवारी चुकीची असली पाहिजे.  नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना  जी मामुली मदत सरकारने देउ केलीय त्याच्याशी स्वाभिमानी असहमत आहे.  कजार्चे पुनर्गठण करणाºया शेतकºयांना  काय लाभ होणार याबाबत स्पष्टता नाही.  केवळ मोठे आकडे देऊन शेतकºयांच्या  तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न आहे.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अजुनही तयार आहोत. २५ जुलैपर्यंत सरकारनी चचेर्साठी वेळ द्यावी. मात्र त्यानंतर स्वाभिमानी थांबणार नाही. सरकारला वाकवुन स्वाभिमानी आपल्या मागण्या मान्य करून घेईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनने सरकारला कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी २५ जुलैपर्यंत मुदत दिलीय. त्यानंतर संघटना आपला निर्णय घेण्यास सक्षम आहे. ’’
 शेतक-यांचा सातबारा कोरा करणे  आणि  स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करणे या दोन मुद्यावर आज देशभरातील संघटना एकत्र आल्या  आहेत. शेतकºयांच्या मागण्यांसाठी मध्य प्रदेशातील  मंदसौरपासुन सहा जुलैला शेतकरी मोचार्ची सुरुवात होईल. १८ जुलैला हा मोर्चा दिल्लीत पोहचेल. या आंदोलनात देशभरातील शेतकरी सहभागी होतील, असे शेट्टी यांनी सांगितले.