शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव भेटीपूर्वी स्वबळाची भाषा

By admin | Updated: June 18, 2017 03:57 IST

राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपाची ताकद वाढविण्याचे आदेश मी येथील नेत्यांना दिले आहेत, असे सांगत, २०१९ ची विधानसभा निवडणुकदेखील

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपाची ताकद वाढविण्याचे आदेश मी येथील नेत्यांना दिले आहेत, असे सांगत, २०१९ ची विधानसभा निवडणुकदेखील भाजपा स्वबळावरच लढेल, असे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दिले. तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर असलेले शहा हे रविवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. २०१४च्या निवडणुकीत भाजपाचे १४५ जागांचे उद्दिष्ट ठेवले होते, ते हुकले. आता आपले लक्ष्य काय असेल, या प्रश्नावर शहा म्हणाले की, सर्वच मतदारसंघांमध्ये आपली ताकद वाढवा, असे मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतरांनाही सांगितले आहे. केवळ विधानसभाच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीसही भाजपा स्वबळावर सामोरे जाईल, असे संकेत शहा यांच्या वक्तव्यावरून मिळाले. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र तीन दिवसांपूर्वीच ते मध्यावधीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता शहा पत्रपरिषदेत म्हणाले की, मध्यावधी निवडणूक होणार असे मुख्यमंत्र्यांनी कुठेही म्हटलेले नव्हते. उद्या मध्यावधी झालीच तर आम्ही लढू आणि जिंकूच. पळून थोडीच जाणार! अशी पुस्ती शहा यांनी स्वत: जोडली. केंद्र सरकारची तीन वर्षांची कामगिरी आणि केंद्राने महाराष्ट्राला या काळात केलेली भरीव आर्थिक मदत याची आकडेवारी त्यांनी दिली. यूपीए सरकारने तेराव्या आयोगात राज्याला दिलेल्या रकमेपेक्षा तब्बल १ लाख ४५ हजार कोटी रुपये मोदी सरकारने अधिक दिले, असा दावा त्यांनी केला. यूपीए सरकारमध्ये अनेक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मानत नव्हते. नरेंद्र मोदी यांनी मात्र तीन वर्षांत पंतप्रधानपदाला प्रतिष्ठा दिली. एका अन्य प्रश्नावर त्यांनी दावा केला की काश्मीरमधील परिस्थिती लवकरच नियंत्रणाखाली येईल आणि त्याची सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होण्याचे त्यांनी समर्थन केले. आंतरराष्ट्रीय सामने हे खेळावेच लागतील, असे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे उपस्थित होते. कोअर कमिटीतही स्वबळ!भाजपाच्या कोअर कमिटीची बैठकही अमित शहा यांनी घेतली. २०१९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीला आतापासूनच लागा, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सरकार आणि पक्षसंघटना हातात हात घालून चालत असल्याचे आज दिसते, तसेच ते पुढेही चालले पाहिजे. याबाबत कोणतीही तक्रार आपल्याकडे येता कामा नये, अशी तंबीही त्यांनी दिल्याचे समजते. राजकारणातील जातीयवाद, लांगुलचालन आणि घराणेशाही संपुष्टात आणली. आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. - अमित शहा