शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

राज्यात अवकाळी पाऊस कायम

By admin | Updated: April 13, 2015 04:51 IST

: अरबी समुद्रासह पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडत असून,

मुंबई : अरबी समुद्रासह पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यात पाऊस पडत असून, १६ एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांना अवकाळी पावसासह गारांचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. १३, १४ व १५ एप्रिल रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर १६ एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे १३ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तर १४ एप्रिल रोजी विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.गेल्या चोवीस तासांत मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. वातावरणीय बदलामुळे मागील दोन दिवसांपासून पश्चिम बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात वादळे तयार झाली आहे. या प्रतिवादळाचा विपरीत परिणाम म्हणून राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारा पडत आहेत, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)