शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासाचा ध्यास

By admin | Updated: May 1, 2017 05:18 IST

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे

 राजेंद्र शर्मा / धुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देशबंधू गुप्ता यांनी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनतर्फे ‘भारत परिवर्तन कार्यक्रम’ राबविण्यासाठी धुळे जिल्ह्याची निवड केली.धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा शाश्वत विकास करण्यासाठी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनने १ नोव्हेंबर २०१० पासून कामाला सुरुवात केली. सहा वर्षांत ६४५ गावांमध्ये ग्रामीण विकास व उपजीविका सुधार अंतर्गत विविध उपक्रम राबवून सुमारे ८५ हजार कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यात यश आले आहे. त्यासाठी २०० प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे पथक कार्यरत आहे.कृषी विकासमुख्य पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी संस्था क्षमता बांधणी, तंत्रज्ञानाची मदत घेण्याबरोबरच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व खते उपलब्ध करुन देत आहे. भात, सोयाबीन व कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना संस्थेमार्फत सहाय्य करण्यात आले. भाजीपाला, फुलशेती व फळबाग लागवडीद्वारे सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत नेण्यात संस्थेला यश मिळाले. नापिक, चढउताराच्या चार हजार एकरहून अधिक जमिनीचे सपाटीकरण करुन ती पिकाखाली आणण्यात आली. त्याचा ६ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला.पशुधन विकास पशुधन विकासाच्या उपक्रमांतर्गत ३ हजार कुटुंबांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. संस्थेने स्वत:ची दुध संकलन केंद्रे उभारली आहेत. नाबार्डच्या सहाय्याने ९ कृत्रिम रेतन केंद्र उभारण्यात आली असून त्याचा ५५ गावांना लाभ होत आहे. १ हजार कुटुंबांनी शेळीपालन व २ हजार कुटुंबानी कुक्कुटपालन असे शेतीपूरक व्यवसाय सुरु केले. कौशल्य विकास : गरीब कुटुंबातील युवक - युवतींसाठी किमान कौशल्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १७ हजार युवकांना प्रशिक्षण देऊन ५ हजार युवकांनी व्यवसाय सुरु केला आहे. विविध लघु उद्योगासाठी १० ते ४५ हजारांपर्यंत संस्थेकडून वित्त पुरवठा करण्यात येतो. संस्थेने विविध बँकाकडून सुमारे २५ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.आठवडे बाजार आठवडी बाजारांची जागा विकसित करण्यात आली. १६ गावांमध्ये शेतकरी व छोट्या विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे, शेड, पाणी व्यवस्था आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.जलसंधारण७८ गावात ८५ सिमेंट बंधारे, ८८ बंधाऱ्यांची दुरुस्ती, ११० नाला खोलीकरणाची कामे केली आहे. त्यामुळे ११ हजार शेतकऱ्यांना शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध झाले. त्यातून १२ हजार एकर जमीन तीनही हंगामात ओलिताखाली आली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे १ हजार शेतकऱ्यांची देशबंधू अ‍ॅग्रो रिसर्च सेंटर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे शेतकरी व ग्राहक थेट जोडण्याचे काम सुरू आहे. कंपनीची दीड कोटींची वार्षिक आर्थिक उलाढाल झाली आहे. शिरपूर व साक्री तालुक्यात उत्पादन कंपन्या स्थापन झाल्या आहेत.