शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे परिचारक निलंबित

By admin | Updated: March 8, 2017 13:38 IST

भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ - भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले आहे. 'एक चौकशी समिती नेमून परिचारक यांचे वक्तव्य तपासण्यात येणार असून तो अहवाल येईपर्यंत परिचारक निलंबित राहतील' असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 
परिचारक याच्या विधानाचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले होते. परिचारक यांचे वक्तव्य अत्यंत घृणास्पद आणि सभागृहाच्या परंपरेला काळिमा फासणारे असून, त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी जोरदार मागणी भाजपा वगळता सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली होती. अखेर त्यांना आज निलंबित करण्यात आले. 
(परिचारकांच्या निलंबनावरून कामकाज ठप्प)
(आमदार परिचारकांना पाकिस्तानला पाठवा, माजी सैनिकांचे आंदोलन)
(आमदार परिचारकांविरोधात सैनिकांचे आंदोलन, पंढरपूर बंद)
(आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात गुन्हा)
 
 
 
 
'वर्षभर सैनिक गावाकडे नसतो, तो सीमेवर पेढे वाटतो आणि सांगतो काय झाले तर, मला मुलगा झाला’’ असे वादग्रस्त वक्तव्य पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना परिचारक यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.  देशाच्या सैनिकांबद्दल व त्यांच्या पत्नींबद्दल असं वक्तव्य करणारा देशद्रोहीच असू शकतो. जर सैनिकांचे मनोबल व्यवस्थित असेल तरच देश सुरक्षित राहू शकतो या गोष्टींचा विचार न करता राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी सैनिकांचा वापर केला जातो. अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्या आमदारकीचा व इतर सर्व पदांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीयांनी केली होती.  त्याच पार्श्वभूमीवर आज हे आंदोलन करण्यात आले असून माजी सैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान परिचारक यांना औरंगाबाद येथे महिला आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.