शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आंबोलीत सापडली संशयास्पद मोटारसायकल

By admin | Updated: March 22, 2015 01:34 IST

आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

सावंतवाडी़/कोल्हापूर : आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत. कोल्हापूर पोलिसांचे पथक घटनास्थळांची व दुचाकीची पाहणी करून परतले असून याबाबतचा अहवाल ते पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार आहेत. त्यानंतरच या तपासाची सूत्रे हलणार आहेत.ही मोटारसायकल कर्नाटकातील राजशेखर नामक व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती आॅगस्ट २०१४ मध्ये चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी बेळगावातील पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतचा तपास सध्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस एकत्रितपणे करीत आहेत.कोल्हापूरची हद्द संपल्यानंतर अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या गडदूवाडी आंबोली येथे मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर मोटारसायकल बेवारस स्थितीत वनमजुरांना आढळून आली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली त्यावेळी या मोटारसायकलीच्या दोन्ही बाजूस नंबरप्लेट नव्हती. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांनी काळ््या रंगाची दुचाकी वापरली होती. आंबोलीत सापडलेली दुचाकी व मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी यात साम्य वाटत असल्याने पोलिसांनी दुचाकीसह जागेची पाहणी केली. (प्रतिनिधी)पुढील भाग तुटलेल्या अवस्थेतगोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी जी दुचाकी वापरली होती, ती काळ्या रंगाची होती तसेच या दुचाकीला कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेत्याच्या सायकलची धडक लागली होती. यावेळी सायकलस्वार व मारेकऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली होती. त्यामुळे सायकलच्या धडकेनंतर दुचाकीचा पुढील भाग तुटू शकतो का, याचाही अभ्यास सुरू असून, सद्य:स्थितीत काहीअंशी या मोटारसायकलीचे पुरावे मिळते जुळते आहेत.‘सीसीटीव्ही’वरतपास केंद्रितपोलिसांनी तपासाची दिशा आंबोलीतील सीसीटीव्हीवर केंद्रित केली आहे. ज्या दिवशी गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्या दिवसापासूनचे आंबोली पोलीस दूरक्षेत्रावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासासाठी घेणार आहेत.