शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

आदिवासी विभागातील वह्या, बूट खरेदीला स्थगिती

By admin | Updated: July 17, 2015 00:16 IST

आदिवासी विकास खात्यातील १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- यदु जोशी, मुंबईआदिवासी विकास खात्यातील १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिवाय, याच विभागांतर्गतच्या आश्रमशाळांना बूट खरेदीचे ४.५० कोटी रुपयांचे काम एका संस्थेला दर करारावर (आरसी) देण्यात आले होते; मात्र आरसीवरील खरेदी सध्या वादात अडकली असल्याने या कंत्राटास स्थगिती देण्यात आली. आता या बूटपुरवठ्यासाठी ई-निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वह्यांच्या खरेदीत विशिष्ट कंत्राटदारांना कंत्राट मिळण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याची तक्रार काही व्यक्तींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे समजते. बूट खरेदीचे कंत्राट कसे देण्यात आले याचीही खमंग चर्चा सध्या आदिवासी विकास विभागात आहे. एका विभागाच्या राज्यमंत्र्याने पुण्यातील एका कंपनीला हे कंत्राट देण्यासाठी दबाव आणला होता. लिडकॉम अंतर्गत नवीन कंपनी/संस्थेची नोंदणी करायची नाही, असा निर्णय पूर्वीच झालेला असताना तो धाब्यावर बसवून या कंपनीला कंत्राट देण्यासाठी दबाव आणला गेला, अशी माहिती आहे. आता या कंपनीने सात ठिकाणी पुरवठा केल्यानंतर कंत्राट स्थगित करण्यात आले आहे. ना बूट, ना गणवेश, ना वह्याआदिवासी आश्रमशाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्या तरी वह्या, बूट वा गणवेश मिळालेले नाहीत. गणवेशांच्या खरेदीचे कंत्राट तीन महिन्यांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र, दहापैकी आठ निविदाकारांचे नमुने प्रयोगशाळेत नाकारले गेल्याने ही निविदाच रद्द करण्यात आली. आता नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी किमान एक महिना तरी वाट पाहावी लागणार आहे.