शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी वाहकांच्या अपहार परिपत्रकाला स्थगिती

By admin | Updated: October 27, 2016 04:18 IST

एसटी वाहकांकडून अपहार केल्याने वर्षाला मोठ्या प्रमाणात महसुल बुडतो. त्यामुळे अपहार करणाऱ्या वाहकांना चाप बसावा यासाठी वाहकांना अंतर्भुुत रक्कमेच्या ५00 ते ७५0

मुंबई : एसटी वाहकांकडून अपहार केल्याने वर्षाला मोठ्या प्रमाणात महसुल बुडतो. त्यामुळे अपहार करणाऱ्या वाहकांना चाप बसावा यासाठी वाहकांना अंतर्भुुत रक्कमेच्या ५00 ते ७५0 पट दंड वसुल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीसाठी ६ आॅगस्ट २0१६ रोजी परिपत्रक काढण्यात आले.त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्यानंतर वाहकांनी या परिपत्रकाबाबत नाराजी व्यक्त करत विरोध केला.वाहकांचा विरोध पाहून काढण्यात आलेल्या परिपत्रकाला परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अखेर बुधवारी स्थगिती दिली. तिकीटांची पुर्नविक्री करणे, कमी दराची तिकीटे देणे, अनियमित तिकीटे देणे, प्रवासभाडे वसुल करुन तिकीट देणे, प्रवासभाडे वसुल न करणे व तिकीट न देणे इत्यादी प्रकारे एसटी वाहकांकडून अपहार केला जातो. त्याबाबतचा तक्रारी प्रवाशांकडूनही एसटीकडे करण्यात येतात. त्याचप्रमाणे अपहार होत असल्याचे एसटी अधिकाऱ्यांच्याही बाब निदर्शनास आली. अपहार होत असल्याने मोठा महसुल बुडत असल्याचे लक्षात येताच त्याबाबतचे एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभाग आणि वाहतूक विभागाकडून सर्वेक्षणही करण्यात आले. या सर्वेक्षणात वाहकांकडून करण्यात येत असलेल्या अपहारामुळे वर्षाला तब्बल ५00 कोटींचा महसुल बुडत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणात काहीवेळेला वाहकांना निलंबितही केले जाते. त्यातून अपहाराची रक्कम मात्र फारशी काही वसुल होत नाही. त्यामुळे अपहाराचे प्रकार थांबावे,महसुलही मिळावा आणि अपहाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघावी यासाठी एसटी महामंडळाने अपहार करणाऱ्या वाहकांवर निलंबन कारवाई ऐवजी तडजोडीची व मोठ्या दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. (प्रतिनिधी)या अन्यायकारक परिपत्रकास स्थगिती देण्यात आली. या परिपत्रकानंतर आंदोलनाचा पवित्रा घेऊन लेखी पत्र प्रशासनाला दिले होते. कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे. - संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना- अध्यक्षया निर्णयामुळे वाहकांना न्याय मिळाला आहे. दिवाळीनिमित्ताने वाहकांसाठी हा चांगला निर्णय आहे. - शिवाजीराव चव्हाण, महाराष्ट्र एसटी कामगार सेना-कार्याध्यक्षकामगारांच्या विरोधामुळे या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली. हा सर्व कामगारांचा विजय असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. - श्रीरंग बरगे, एसटी कर्मचारी काँग्रेस-सरचिटणीस