शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनाबद्दल पोलिसांत चीडचीड

By admin | Updated: June 5, 2017 03:23 IST

विनयभंग प्रकरणाची तक्रार घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची महिला पोलीस हवालदार पी.पी. संख्ये यांनी चौकशी केली.

जितेंद्र कालेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विनयभंग प्रकरणाची तक्रार घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची महिला पोलीस हवालदार पी.पी. संख्ये यांनी चौकशी केली. त्यानंतर ठाणे अंमलदाराने त्यांची तक्रार नोंदवून घेतली. मात्र, या तक्रारीवर संख्ये यांची स्वाक्षरी घेण्याची औपचारिकता पूर्ण न केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तांत्रिक बाबीमुळे झालेल्या कारवाईबद्दल पोलीस वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे.मानपाड्यातील एक महिला आपल्या पती आणि शेजारील महिलेसोबत १५ मे रोजी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार करण्याकरिता आली होती. एका आंबटशौकिनाने तिच्या नकळत ती अंघोळ करतानाचे चित्रीकरण त्याच्या मोबाइलमध्ये केले होते. ही बाब लक्षात येताच तिने त्याचा मोबाइल हिसकावून पतीसह पोलीस ठाणे गाठले होते.तिच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत उपनिरीक्षक पवार यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला रात्री ९.३० वा. अटकही केली. महिला हवालदार संख्ये यांच्या चौकशीनंतरच या प्रकरणाची तक्रार दाखल झाली होती. संख्ये यांना त्यादिवशी पोलीस ठाण्याच्या सीसीटीएनएस (क्राइम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) मध्ये गुन्हे नोंदवण्याची ड्युटी होती. त्यामुळे संख्ये यांच्या उपस्थितीत ही तक्रार नोंदली गेली, अशी नोंद करून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्याची औपचारिकता पूर्ण करणे राहून गेले. तक्रारदार महिलेने आपले ते चित्रीकरण पुरुष पोलिसांनी वारंवार पाहिल्याने आपला पुन:पुन्हा विनयभंग झाल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळा रंग प्राप्त झाला. प्रसारमाध्यमांत चर्चा रंगली. थेट गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दखल घेतली व संबंधितांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना दिले. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी अगोदर केली होती. मात्र, मीडिया व राजकीय दबाव वाढल्याने मुख्यालयाच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही चौकशी केली. आरोपी अटकेनंतरही कारवाईमुळे नाराजीमहिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लागलीच आरोपीला अटक केली. चौदावे रत्न दाखवल्याने त्याने आपली चूक कबूल केली. त्याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील झाली. मात्र, एका तांत्रिक चुकीकरिता उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती काही पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.