शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील पाडकामाला स्थगिती

By admin | Updated: July 18, 2016 05:30 IST

लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पावसाळ्याचे पुढील तीन महिने कारवाई केली जाणार नाही

नवी मुंबई : नवी मुंबईतील गावठाणांमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पावसाळ्याचे पुढील तीन महिने कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई थांबवली. या कालावधीमध्ये घरे कायम करण्यासाठीचा अध्यादेश आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या २० हजार बांधकामांना तीन महिन्यांसाठी दिलासा मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे. ३१ डिसेंबर २०१२ पर्यंतची घरे नियमित करण्यासाठीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले आहे. याविषयी अध्यादेश काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. याविषयी सिडकोने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परंतु अद्याप अध्यादेश नसल्याने सिडकोने व काही दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. नूतन आयुक्त मुंढे त्याबाबत आग्रही आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतापले असून त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलैला नवी मुंबई बंदचा निर्णय घेतला होता. किमान २५ हजार हजार नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. याविषयी अहवाल शासनास पाठविला होता. (प्रतिनिधी)>तात्पुरता दिलासाप्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने आमदार मंदा म्हात्रे व भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी लोकभावना लक्षात घेऊन पावसाळ्यात तीन महिने कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.