शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्मावरील एफआयआरला स्थगिती

By admin | Updated: March 24, 2017 02:02 IST

गोरेगावमधील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी हास्य कलाकार कपिल शर्माविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली

मुंबई : गोरेगावमधील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी हास्य कलाकार कपिल शर्माविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. तर महापालिकेला हे प्रकरण पाच आठवड्यांत निकाली कढण्याचे निर्देश देत कपिलने केलेली याचिका निकाली काढली.गोरेगावमधील ‘डीएलएच एनक्लेव्ह’ या १८ मजली इमारतीमध्ये कपिल शर्मा आणि बॉलीवूड अभिनेता इरफान खान राहत आहेत. त्यांनी आवश्यक ती परवानगी न घेता फ्लॅटमध्ये अतिरिक्त बांधकाम केल्याचा आरोप करत महापालिकेने या दोघांनाही एप्रिल व सप्टेंबर २०१६ मध्ये नोटीस बजावली आणि दोघांनाही बांधकाम पाडण्यास सांगितले. या दोघांनी या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.गुरुवारच्या सुनावणीत महापालिकेने या दोघांना महापालिका कायद्यातील कलम ३५० अंतर्गत बजावलेली नोटीस मागे घेतल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे खंडपीठाने कपिल शर्मावर करण्यात आलेल्या एफआयआरवर स्थगिती दिली. (प्रतिनिधी)