शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोहिमेस स्थगिती

By admin | Updated: January 9, 2016 04:01 IST

जेजुरी येथील राज्य महामार्ग क्रमांक ११७लगतची सर्व बांधकामे बेकायदेशीर ठरवून ही बांधकामे १० जानेवारी रोजी जमीनदोस्त करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला

मुंबई : जेजुरी येथील राज्य महामार्ग क्रमांक ११७लगतची सर्व बांधकामे बेकायदेशीर ठरवून ही बांधकामे १० जानेवारी रोजी जमीनदोस्त करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. मात्र या विभागाने नागरिकांना ४ जानेवारी रोजी बजावलेली नोटीस बेकायदेशीर ठरवून उच्च न्यायालयाने या अतिक्रमण हटाव मोहिमेस गुरुवारी स्थगिती दिली. जेजुरी येथील राज्य महामार्गाचे रुंदीकरण करायचे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गालगत असलेल्या सर्व बांधकामांना २४ सप्टेंबर रोजी नोटीस बजावली. त्याविरोधात स्थानिकांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले. या अपिलावर सुनावणी प्रलंबित असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ जानेवारी रोजी स्थानिकांना पुन्हा एकादा नोटिसा बजावल्या. त्याविरुद्ध स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.‘महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी राज्य सरकारला संबंधित भूखंड हवा आहे. मात्र भूसंपादन केल्यानंतर स्थानिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी निधी नसल्याने सरकार संबंधित अधिकृत बांधकामे अनधिकृत आहेत, असे भासवून जमीनदोस्त करणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने २४ सप्टेंबर रोजी बजावलेल्या नोटीसविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांपुढे केलेल्या अपिलावरील सुनावणी प्रलंबित आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कायद्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा नोटिसा बजावल्या आहेत, असा युक्तिवाद अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी खंडपीठापुढे केला.खंडपीठाने याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांची व सार्वजनिक बांधकाम विभागाची खरडपट्टी काढली. अपील प्रलंबित असतानाही दुसऱ्यांदा नोटिसा बजावल्या कशा? कायदा विसरलात का? अशा शब्दांत खंडपीठाने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारले. त्यावर आपली चूक मान्य करत लवकरच या अपिलावर निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे आश्वासन सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिले.तुमच्याकडे पाहता तुम्ही स्थानिकांच्याविरोधातच निर्णय द्याल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे विरोधात निर्णय घेतल्यास निर्णयावर दोन आठवड्यांची स्थगिती असेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.