शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दोन अधिकाऱ्यांना निलंबनाचा डोस!

By admin | Updated: April 12, 2016 05:02 IST

बेलगाम औषध खरेदी करून त्यांचे मनमानी वाटप करण्याप्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपसंचालक डॉ. राजू जोतकर आणि खरेदी कक्षातील तत्कालीन सहायक संचालक डॉ. सचिन देसाई

- अतुल कुलकर्णी, मुंबई बेलगाम औषध खरेदी करून त्यांचे मनमानी वाटप करण्याप्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपसंचालक डॉ. राजू जोतकर आणि खरेदी कक्षातील तत्कालीन सहायक संचालक डॉ. सचिन देसाई यांना सरकारने तत्काळ निलंबित केले आहे. तशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. विधान परिषदेचे कामकाज दोनवेळा बंद पडले तर विधानसभेत गदारोळातच मंत्र्यांनी निवेदन सादर केले.२९७ कोटींच्या औषध खरेदीप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव स्वीकारणे कसे योग्य आहे, याची त्यांनी मांडणी केली; मात्र सभापती रामराजे निंबाळकर यांनी तो फेटाळला. तर त्यावर मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी निवेदन करण्यास सुरुवात केली. स्थगन नाकारल्यानंतर निवेदन कसे करता येईल, असा मुद्दा उपस्थित झाला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शेवटी सभागृह दोनवेळा तहकूब करावे लागले. विधानसभेतही डॉ. सावंत यांना निवेदन करण्यास आडकाठी केली गेली. कोणतीही चर्चा सुरू झालेली नसताना मंत्र्यांनी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा करून भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र यात मोठे अधिकारी अजूनही मोकाट आहेत. झाल्या प्रकरणाची सगळी माहिती आम्ही सभागृहात पुराव्यानिशी ठेवणार आहोत, असेही मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.औषध खरेदी प्रकरणी तपास करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्याची एक सदस्यीय समिती नेमण्यात येत असल्याची घोषणाही या वेळी मंत्री डॉ. सावंत यांनी केली. मंत्र्यांच्या निवेदनाने आमचे समाधान झालेले नाही, आम्ही हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार आहोत, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.