शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बाटल्यांमधून मद्यविक्रीबंदीला स्थगिती

By admin | Updated: April 2, 2016 01:35 IST

प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून मद्य विकण्यास मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेवर शुक्रवारी उच्च न्यायालयाने ३० जूनपर्यंत स्थगिती दिली. १ एप्रिलपासून या अधिसूचनेवर अंमलबजावणी होणार होती.

मुंबई : प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून मद्य विकण्यास मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेवर शुक्रवारी उच्च न्यायालयाने ३० जूनपर्यंत स्थगिती दिली. १ एप्रिलपासून या अधिसूचनेवर अंमलबजावणी होणार होती.पेट बाटल्यांमधून विकण्यात येणाऱ्या मद्यामुळे लोकांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो. तसेच यामुळे सरकारच्या महसूलावरही परिणाम होत आहे, असे म्हणत सरकारने ११ जानेवारी रोजी पेट बाटल्यांमधून मद्यविक्री करण्यास मनाई करणारी अधिसूचना काढली. या अधिसूचनेवर १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले होते.मात्र या अधिसूचनेला विरोध करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. डी. एच. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. काचेच्या व प्लॅस्टिकच्या फेकलेल्या बाटल्या जमा करण्यासाठी उत्पादकांनी माणसे नियुक्त करावीत. या माणसांना पुरेसा मोबदला द्यावा, अशी सूचना खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी उत्पादक कंपन्यांना दिली होती. या मॉडेलवर काम करण्याची हमी उत्पादकांनी दिल्यानंतर हायकोर्टाने ३० जूनपर्यंत अधिसूचनेवर स्थगिती दिली. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १४ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)