शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित अधीक्षक आॅनड्युटीच! भायखळा कारागृहात गोंधळ सुरूच; मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 04:17 IST

वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात विधिमंडळात मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी कारागृहातील दोन अधीक्षकांना निलंबित केले. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, अधीक्षक तानाजी घरबुडवे, चंद्रमणी इंदुरकर आॅनड्युटी आहेत.

मनीषा म्हात्रे ।मुंबई : वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात विधिमंडळात मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी कारागृहातील दोन अधीक्षकांना निलंबित केले. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, अधीक्षक तानाजी घरबुडवे, चंद्रमणी इंदुरकर आॅनड्युटी आहेत. ते भायखळा कारागृहातील कारभार पाहत असून, कर्मचाºयांवर दबाव आणत असल्याचे तेथील कर्मचाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मंजुळाचा मृत्यू झाला, त्या दिवशी चंद्रमणी इंदुरकर दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात होते. त्यानंतर रात्री मंजुळाचा मृत्यू झाल्याबाबत त्यांना महिला अधिकाºयाने कळविले. तरीदेखील ते कारागृहात हजर राहिले नाहीत. त्यांना कारागृह महानिरीक्षकांनी कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. मंजुळाच्या हत्येची माहिती समजताच कारागृहातील महिलाकैद्यांनी गोंधळ घातला. तरीही त्यांनी पुण्याहून मुंबईला येण्याऐवजी नाशिकला गावी जाणे पसंत केले. तेथे त्यांची खासगी कामे उरकून दुपारी ३.३०-४च्या सुमारास ते नाशिकवरून मुंबईत आले. तोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कारागृहातील परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्यामुळे, रात्री ११ वाजेपर्यंत कारागृहात दंगल सुरू होती.१ आॅगस्टला विधिमंडळात घरबुडवे, इंदुरकरांच्या निलंबनाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केली. तरीही ते आॅनड्युटी आहेत. निलंबनाचा राग कर्मचाºयांवर काढत असल्याचे कर्मचाºयाने ‘लोकमत’ला सांगितले. त्यांना पुराव्यांमध्ये फेरफार करण्यास संधी मिळत आहे. दोघांनीही वरिष्ठांकडे निलंबन मागे घेण्यासाठी फिल्डिंग लावली असून, मंत्रालयाच्या खेपा वाढवल्याचेही कर्मचाºयाचे म्हणणे आहे. दुसरीकडे निलंबनाचे आदेश मिळाले नसल्याचे कारागृह अधिकाºयांकडून समजते.