कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेतील निलंबित उपअभियंता दत्तात्रय मस्तूद (४५) यांनी सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मोहन हाइट्समधील इम्प्रेस टॉवरच्या ७व्या मजल्यावर ते पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. त्यांना घशाच्या कर्करोगाचा आजार होता आणि त्याच्यावर उपचारही सुरू होते. गेल्या वर्षी अनधिकृत बांधकामांसाठी ४ लाख रु पयांची लाच स्वीकारताना माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांच्यासह त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
केडीएमसीच्या निलंबित उपअभियंत्याची आत्महत्या
By admin | Updated: December 9, 2015 01:31 IST