शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट रेशन कार्डप्रकरणी तिघे निलंबित

By admin | Updated: April 21, 2015 01:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या नावाने बोगस रेशन कार्ड तयार करण्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव

संदीप प्रधान, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या नावाने बोगस रेशन कार्ड तयार करण्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रकरणात तहसीलदास अशोक टेंभरे यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली असून, जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी, लिपिक एस. जी. पारखेडकर व निरीक्षण अधिकारी के. यू. फुके यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात तहसीलदाराने सहा हजार बोगस रेशन कार्डे तयार केल्याचा आरोप भाजपाचे विधान परिषद सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी केला होता. यामध्ये पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याखेरीज अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावे तयार केलेल्या रेशन कार्डांचा समावेश होता. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की, याबाबत चौकशी पूर्ण झाली असून तहसीलदाराच्या निलंबनाची शिफारस महसूल खात्याला केली आहे. याखेरीज आपल्या खात्याशी संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.राज्य शासन रेशन कार्ड तहसीलदाराकडे सोपवते. खामगावच्या तहसीलदाराने त्यांच्या ताब्यातील सहा हजार रेशन कार्डे त्यांच्या क्षेत्रातील २७ दुकानदारांना प्रत्येकी २०० याप्रमाणे वाटली. रेशन दुकानदारांनी ही रेशन कार्डे मोदी, फडणवीस, बापट वगैरेंच्या नावे तयार करून त्यावर धान्य उचलल्याचे दाखवून धान्याचा काळाबाजार केला. विशेष बाब म्हणजे राजकीय नेत्यांच्या नावांनी बोगस रेशन कार्डे तयार करताना त्यांच्या कुटुंबीयांची नावे व वय अचूक लिहिली जातील याची काळजी घेतलेली आहे. रेशन कार्ड दुकानदार गेले दीड वर्ष या कार्डांवर धान्य उचलत होते.या संपूर्ण व्यवहारात सरकारी अधिकारी-कर्मचारी आणि रेशन दुकानदार यांच्यात रेशन कार्डे देण्याच्या बदल्यात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका सरकारला असल्याने या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून पोलिसी चौकशी सुुरू केलेली आहे.