शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

निलंबित कारागृह अधीक्षक चौकशीच्या फेऱ्यात

By admin | Updated: December 29, 2016 01:57 IST

एका महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी निलंबित केलेले ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या चौकशीसाठी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे

- जितेंद्र कालेकर,  ठाणेएका महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी निलंबित केलेले ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या चौकशीसाठी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या गृहविभागाने, सहासदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. येत्या दोन महिन्यांत या समितीने याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी जाधव यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामीनही मिळवला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, गृहविभागाने लैंगिक छळवादप्रकरणी जाधव यांची विभागीय चौकशी करण्यासाठी प्रशासन विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यास प्रशासन विभागाने मान्यता दिली असून, मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरविंद सावंत, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अनुपमा पवार, अशासकीय संस्थेच्या फरिदा लांबे हे सदस्य, तर येरवडा कारागृहाच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटवार यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. समितीला आवश्यक ती माहिती, तसेच कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी समितीच्या सदस्य सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. दोषारोपपत्रातील बाबींची सविस्तर चौकशी करून, अहवाल येत्या दोन महिन्यांत शासनाला द्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)अश्वती दोरजे यांची समितीमुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरविंद सावंत, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अनुपमा पवार, अशासकीय संस्थेच्या फरिदा लांबे हे सदस्य, तर येरवडा कारागृहाच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटवार यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.